Jalgaon : लम्पी प्रतिबंधावर 100 टक्के लसीकरण

Lumpy vaccination
Lumpy vaccination esakal
Updated on

जळगाव : गुरांमध्ये आढळून येत असलेल्या लम्पी या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी ठरत आहे. आतापर्यंत लसीकरण मोहिमेत १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

३० सप्टेंबरअखेर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या दप्तरी नोंद असलेल्या १०० टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला यश आले आहे. तरीदेखील लसीकरणापासून जनावरे वंचित असल्यास पशू पालकांनी पशू वैद्यकीय दवाखाने किंवा जिल्हा परिषदेच्या पशू संवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यात लम्पी या संसर्गजन्य आजाराची लक्षणे गुरांमध्ये दिसून आल्यानंतर व राज्य शासनाकडून या बाबतच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेची यंत्रणा कामाला लागली होती. जिल्ह्यातील ग्रामीण भागासह खेड्या पाड्यांवर भेटी देऊन लक्षणे असलेल्या जनावरांची माहिती घेण्यासोबतच पशू पालकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना देखील राबविण्यात आल्या.(100 percent vaccination on Lumpy Disease prevention jalgaon News)

Lumpy vaccination
5G launch updates : स्वस्त की महाग? ५ जीचा तुम्हाआम्हाला काय फायदा?

त्यासोबतच पशू सखी, कृषी सखी यांच्या माध्यमातून सर्वेक्षण देखील करण्यात आले. ५ ऑगस्टपासून प्रतिबंधात्मक लसीकरण मोठ्या प्रमाणात व्हावे, या साठी विशेष मोहीम देखील घेण्यात आली.

साडेपाच लाख गुरांचे लसीकरण

जिल्ह्यातील सर्व एकूण पाच लाख ६० हजार ३६० पशूंचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने लसीकरण पूर्ण करण्यासोबतच औषधोपचारासाठी मोफत औषधे उपलब्ध करून दिली आहेत. लसीकरण १०० टक्के झाले असले तरी ही लढाई अद्याप संपलेली नाही हे गृहीत धरून जिल्हा परिषदेतर्फे सर्वोतो उपाययोजना केल्या जात आहेत.

साडेसात हजार बाधित

जिल्ह्यात आजपर्यंत ७ हजार ५६६ बाधित पशू जिल्ह्यात आढळून आले आहेत तर आजपर्यंत ३ हजार ५८५ पशू ‘लम्पी’तून बरे झाले आहेत.

लसीकरणापासून पशू वंचित असेल तर यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे .

तालुकानिहाय आकडेवारी

तालुका----- लसीकरण

अमळनेर----३०२००

बोदवड-----१४२२५

भुसावळ-----१५९५८

भडगाव------३३३८८

चोपडा------४०५३३

चाळीसगाव---९७४९१

जळगाव------३५६४९

जामनेर-------६१२७७

एरंडोल-------२७०९९

धरणगाव------२१९२२

मुक्ताईनगर-----३१६६१

पारोळा--------३९६१२

पाचोरा--------५३९७६

रावेर---------३११२१

यावल---------३०५१०

Lumpy vaccination
Minister Dada Bhuse NMC Meeting : योजना जुन्याच, मात्र नव्या स्वरूपात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.