KBCNMU News : ज्येष्ठांच्या मदतीला येणार तरुण ‘सहाय्यता दूत’; विद्यापीठाचा उपक्रम

senior citizen
senior citizen esakal
Updated on

KBCNMU News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे १०० विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत म्हणून प्रशिक्षित केले जाणार आहे. (100 students will be trained as Senior Citizen Assistance Ambassadors in kbcnmu jalgaon news)

विद्यापीठ परिक्षेत्रात ३०० ज्येष्ठ नागरिक संघ असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी या विभागातर्फे सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. लॉकडाउन काळात ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले.

नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने मुले परदेशात अथवा मोठ्या शहरांमध्ये गेल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आपल्या घरी एकाकीपणाचे जीवन जगत असल्याचे आढळून आले आहे. या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य, किराणा, प्रवास, बँक व पोस्टाची कामे करण्यासाठी मदतीची गरज असते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

senior citizen
Krishna Janmashtami : दहीहंडी फोडण्याचा मान यंदाही तरुणींच्या पथकास; जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाउंडेशनचा उपक्रम

जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांत या ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी या विभागामार्फत १० ते १४ ऑक्टोबरपर्यंत १०० विद्यार्थ्यांना तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत म्हणून प्रशिक्षण दिले जाणार आहे. यापूर्वी २०२१ मध्ये ५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले होते.

सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनींची भोजन व निवासाची व्यवस्था विद्यापीठामार्फत‍ केली जाणार आहे. संलग्नित महाविद्यालयांनी प्रत्येकी १ विद्यार्थी व विद्यार्थिनीचे नाव संचालक, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांना १६ सप्टेंबरपर्यंत कळवावे, असे आवाहन संचालक प्रा. आशुतोष पाटील यांनी केले आहे.

senior citizen
Jalgaon News : जिल्ह्यात अजूनही 67.73 टक्के शेतकऱ्यांचा पीकपेरा बाकी; ई-पीक पाहणीचे App या लिंकवरुन करा Download

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.