Jalgaon Agriculture News : जिल्ह्यात 108 टक्के कापसाची पेरणी; 91 टक्के पेरण्या पूर्ण

sowing
sowingesakal
Updated on

Jalgaon Agriculture News : जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के पाऊस झाला आहे. दुसरीकडे खरिपाच्या ९१ टक्के पेरण्या शेतकऱ्यांनी आटोपल्या आहेत. सर्वाधीक पेरा कापसाचा झाला आहे.

पाच लाख एक हजार ५६८ हेक्टरवर कापसाचा पेरा अपेक्षित होता. तो शेतकऱ्यांनी पाच लाख ४१ हजार ५६५ (१०८ टक्के) हेक्टरवर केला आहे. त्या खालोखाल मक्याचा ७४ हजार ८७८ हेक्टरवर पेरा झाला आहे.

जिल्ह्यात २६ जूनपर्यंत पावसाचे आगमन झाले नव्हते. मात्र, ६ जुलैसून शहरासह जिल्ह्यात चांगल्या पावसाने हजेरी लावली. यामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना चांगलाच वेग आला. (108 percent cotton sowing in district jalgaon news)

अवघ्या २३ दिवसांत जिरायती कापसासह, ज्वारी, मका, बाजरी, तूर, मूग, उडिदाच्या पेरण्या झाल्या. काही शेतकऱ्यांनी उडीद, मुगाचा पेरा करणे टाळले, तर काहींनी पेरणी केली आहे. इतर शेतकऱ्यांनी कपाशीचा पेरा अधिक केला आहे.

पुन्हा कापसाची ‘डेअरिंग’

२०२२ च्या हंगामातील कापसाला १० ते १३ हजार प्रतिक्विंटल भाव मिळणे अपेक्षित होते. मात्र, शेतकऱ्यांना साडेसात ते साडेआठ हजारांच्या आतच भाव मिळाला. चांगला दर मिळेल, म्हणून शेतकऱ्यांनी घरात कापूस ठेवला.

रब्बी हंगाम संपला. तरीही कापसाला दहा ते १३ हजारांचा दर मिळाला नाही. सुमारे ३० टक्के घरात कापूस असताना, शेतकऱ्यांनी पुन्हा कापूस पीक घेण्याची डेअरिंग केली आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी कापसाकडे पाहतात. यामुळे आतापर्यंत पाच लाख ४१ हजार ५६५ हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे.

आतापर्यंत झालेल्या पेरण्या अशा

पीक--हेक्टर--टक्के

कापूस--५४१५६५--१०८ टक्के

मका--७४८७८--७६.४

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

sowing
Nashik Agriculture: पेरणीचा पॅटर्नही झाला कन्फ्यूज! पावसाच्या अनियमिततेने दणका, जिल्ह्यात अवघी 61 टक्के पेरणी

बाजरी--६२६२३--४९.७

ज्वारी--१८७०५--४१.८

तृणधान्ये--१०१४३९--६३

तूर--१०३९७--६३

मूग--१२८६८--४५.८

उडीद--१३८४४--५२.६

भुईमूग--७३५--२४.५

तीळ--२३५--११.६

सुर्यफूल--१४--२२

सोयाबीन--१७०१०--५७.४

एकूण गळीत--१८००४--५०.९ टक्के

sowing
Non- Agricultural Permission: जमिनींना अकृषिक परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.