SSC-HSC Exam 2024 : दहावी-बारावीचे 2 फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परिक्षा

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १५० ते २९ फेब्रुवारी या कालावधीत तर इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
SSC-HSC Exam 2024
SSC-HSC Exam 2024 esakal
Updated on

जळगाव : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १५० ते २९ फेब्रुवारी या कालावधीत तर इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

प्रात्यक्षिक परिक्षेतील गुणदान पद्धतीवरही भरारी पथकांची नजर राहणार आहे. (10th 12th practical exam from 2nd February jalgaon news)

जिल्ह्यात दहावी, बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या व परीक्षा केंद्रे अद्यापही जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाली नसल्याचे सांगण्यात आले. बोर्डाच्या परिक्षेपुर्वी शाळा महाविद्यालयांनी सराव चाचण्यांद्वारे परीक्षेची तयारी सुरू केली आहे.

'सीबीएसई' वेळापत्रक

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक सीबीएसई बोर्डाने cbse.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.

त्यानुसार बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल तर दहावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत होणार आहेत.

मंडळाच्या वेळापत्रक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अंतिम वेळापत्रकानुसार बारावी बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान घेतली जाणार आहे.

SSC-HSC Exam 2024
Jalgaon News : न्हावी ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांअभावी वाऱ्यावर; तीन महिन्यांपासून गैरसोय

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमनिहाय www.mahasscboard.in या संकेतस्थळावर परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध आहे.

अनेक कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी थेट बोर्डाच्या परीक्षेलाच येतात, महाविद्यालयांनी पटसंख्या टिकविण्यासाठी अनेकांचे प्रवेश कागदोपत्री केलेले असतात.

शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना निकाल १०० टक्के लागावा, म्हणून विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा न घेताच त्यांना १८ ते २० गुण (२० पैकी) दिले जातात.

अशाही तक्रारी बोर्डाकडे आल्याने बोर्डाचे आता शाळांकडून प्रात्यक्षिक घेतले जाते का, विज्ञानाचे प्रयोग होतात का, याची पडताळणी करण्यासाठी बोर्डाने विशेष पथके प्रात्यक्षिक परिक्षांच्या काळात वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांना अचानक भेटी देतील, अशी माहिती देण्यात आली.

SSC-HSC Exam 2024
Competitive Exam : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मनपातर्फे मोफत मार्गदर्शन; राज्यातील पहिलाच उपक्रम

शिक्षणविभाग अनभिज्ञ

दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परिक्षा व मुख्य लेखी परिक्षांबाबत विचारले असता, परिक्षांचे वेळापत्रक शाळा, महाविद्यालयांना बोर्डाकडून पाठविले जातात.

अजून बोर्डाची बैठक झालेली नाही. बैठक होइल तेव्हा विद्यार्थी संख्या, केंद्राची संख्या, भरारी पथकांची माहिती उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.

SSC-HSC Exam 2024
Jalgaon News : अयोध्येतील रामलला प्राणप्रतिष्ठेनिमित्त 20 चौकांचे सुशोभिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.