Jalgaon News: शेळगाव बॅरेजला वनविभागाची 11.59 एकर जमीन; नागपूर वनविभागाची मंजुरी

land
land esakal
Updated on

Jalgaon News : शेळगाव (ता.जळगाव) येथील सिंचन प्रकल्पात वनविभागाच्या जमिनीचा अडसर येत होता. ती जमीन वनविभागाकडून प्रकल्पाला मिळविण्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना यश आले आहे. अवघ्या पाच महिन्याच्या कालावधीत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सातत्याने पाठपुरावा करीत वनविभागाची ११.९५ एकर जमीन शेळगाव बॅरेजला मिळवून दिली आहे.

त्याबाबत नागपूर वनविभागाने जळगाव वनविभागाची जमीन देण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे शेळगाव बॅरेजला ९ हजार १२८ हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची सोय होईल. (11 59 Acres of Forest Department land at Shelgaon Barrage jalgaon news)

याचा फायदा जळगावसह यावल तालुक्याला होईल. यावल तालुक्यात अनेक गावे डार्कझोनमध्ये आहेत. त्या गावातील पाण्याची पातळी वाढेल. दोन्ही तालुक्यांची पाण्याची चिंता मिटेल. सद्यस्थितीत शेळगाव बॅरेजमध्ये साठ टक्के पाणी साठत आहे. शंभर टक्के पाणी साठविण्यासाठी वनविभागाची ११.९५ एकर जमिनीची अडचणी येत होती.

ती जमीन वनविभागाने दिल्यास बॅरेजमध्ये शंभर टक्के पाणी साठणार होते. वनविभागाची घेण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी मुंबई, नागपूर, दिल्लीच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी अनेक वेळा विषय लावून धरला.

land
Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात मृतांच्या नावाने ‘शस्त्र परवाने’; शस्त्र न घेतलेल्या 45 जणांचे परवाने रद्द

पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, दोन्ही खासदार, मंत्रालयात अनेक वेळा संपर्क साधला. या प्रकल्पासाठी वनविभागाची जमीन कशी आवश्‍यक आहे. त्याचा जिल्ह्यातील नागरिकांना कसा फायदा होणार आहे, याबाबत वारंवार माहिती दिली. अखेर नागपूर वनविभागाने ११.९५ एकर जमीन देण्यास मंजुरी दिल्याने प्रकल्प पूर्ण होऊन त्यात शंभर टक्के पाणी साठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

"वनविभागाची जमीन मिळण्याबाबत नागपूर वनविभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे शेळगाव बॅरेजमध्ये पाणी शंभर टक्के साठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जून २०२४ मध्ये शंभर टक्के पाणी साठेल. याचा जळगाव, यावल तालुक्यांना मोठा फायदा होणार आहे." -संतोष भोसले, कार्यकारी अभियंता, जळगाव मध्यमप्रकल्प विभाग क्रमांक २

"शेळगाव बॅरेजमध्ये पाणी साठविण्यासाठी वनविभागाची जमीन हवी होती. मी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची बैठका घेतल्या. मुंबई, दिल्ली येथे पाठपुरावा केला. सर्व लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळाले. वनविभागाची जमीन शेळगाव बॅरेज सिंचन प्रकल्पाला मिळाल्याने प्रकल्प पूर्ण होणार आहे." -आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

land
Jalgaon News: महापालिकेतर्फे 193 घरपट्टी थकबाकीदारांना जप्ती नोटीस; होणार धडक कारवाई'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.