Jalgaon : 11 वर्षीय मुलास शस्त्रक्रियेद्वारे जीवदान

Thoracoscopy surgery
Thoracoscopy surgeryesakal
Updated on

जळगाव : गंभीर न्यूमोनियासह छातीत डाव्या बाजूला संपूर्ण पाणी भरल्याने श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या अकरा वर्षीय मुलावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात थोरकोस्कॉपी शस्त्रक्रियेद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले. (11 year old boy saved by Thoracoscopy surgery jalgaon latest Marathi News)

मुंबई-पुणे येथे होणारी वॅट्स अर्थात व्हिडीओ असिस्टेड थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया गोदावरी संस्थेच्या रुग्णालयात होत आहे. अकरा वर्षीय मनोज (नाव बदललेले) श्वासोच्छवासास त्रास, हिमोग्लोबिन कमी असल्याच्या कारणास्तव दाखल झाला होता.

या वेळी बालरोग शल्यचिकित्सक डॉ. मिलिंद जोशी यांनी सीटी स्कॅन करण्यास सांगितले. त्यात गंभीर न्यूमोनियासह छातीचा डावा भाग हा पाण्याने भरल्याने फुफ्फुसावर दबाव येऊन त्याचे कार्य बंद झाले होते.. परिणामी रुग्णाला श्वासोच्छवासास त्रास उद्‌भवला होता.

दुर्बिणीद्वारे छिद्र पाडून काढले पाणी

भूल दिल्यानंतर डॉ. मिलिंद जोशी यांनी रुग्णाच्या छातीजवळ १० व ५ मिलिमिटरचे तीन छिद्र केले. त्याद्वारे दुर्बीण टाकून फुफ्फुसातील संपूर्ण पाणी काढले. तसेच त्यावरील आवरण काढून फुफ्फुस मूळ स्थितीत आणले. निवासी डॉ. श्रीयश सोनवणे, डॉ. अनिश जोशी, डॉ. वरुणदेव यांनीही शस्त्रक्रियेत मदत केली.

Thoracoscopy surgery
Nashik Crime : 2 लाखाचा गांजा जप्त; दोघांना अटक

‘एक्स रे’ नॉर्मल

शस्त्रक्रियेनंतर पुन्हा रुग्णाचा एक्स रे काढण्यात आला. याप्रसंगी आधीचा एक्स रे जो पांढरा दिसत होता, तो शस्त्रक्रियेनंतर उजव्या बाजूच्या छातीच्या एक्स रे सारखा दिसून आला. ११ वर्षीय मुलगा आता श्वासही घेऊ लागला असून रक्‍तातील ऑक्सिजनची पातळीही आता नॉर्मल झाली.

Thoracoscopy surgery
NAMCO बँकेला रिझर्व्ह बँकेकडून 50 लाखाचा दंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.