एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याप्रमाणे चोरटा सांगतोय त्याचे कार्यक्षेत्र...

एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले कार्यक्षेत्र सांगावे त्या थाटात या चोरट्याने पोलिसांना माहिती दिली आहे.
thief
thiefesakal
Updated on

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेने एक मोटारसायकल चोरटा अटक केला आहे. त्याच्याकडून तब्बल डझनभर चेारीच्या मोटारसाकली जप्तही करण्यात आल्या. अटकेतील हा चोरटा जिल्हानिहाय गुन्हे करुन ठिकाण बदलत असल्याने आजवर पोलिसांना मिळून आला नाही. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले कार्यक्षेत्र सांगावे त्या थाटात त्याने वेगवेगळ्या जिल्‍ह्यातून चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

thief
Army मध्ये नोकरीच्या आमिषाने घालायचा लाखोंचा गंडा; भामटा गजाआड

जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर अशा विविध जिल्ह्यात रोटेशन पद्धतीने चोऱ्या करून आपला ठावठिकाणा बदलणाऱ्या चोरट्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक अमोल देवढे, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अनिल देशमुख, राहुल पाटील अशांनी जळगाव रेल्वे स्थानक परिसरातून विकास ऊर्फ विक्की शिवाजी महाले याला ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर उडवाउडवीची उत्तरे देत त्याने वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याची ‘खातरपाणी’ केल्यावर त्याने चाळीसगाव शहरातून मोटारसायकली चोरल्याचे सांगितले. पोलिस प्रसाद मिळाल्यावर विक्कीने एका मागून एक अशा तब्बल १२ मोटारसायकली पोलिसांना काढून दिल्या आहेत.

thief
गद्दार कोणाला म्हणता? तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..., केसरकरांनी खडसावलं
पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी.
पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी.SYSTEM

जुगारामुळे बनला चोर

अटकेतील विकास ऊर्फ विक्की महाले याला जुगाराचा नाद आहे; तो पूर्ण करण्यासाठी पूर्वी तो घरफोड्या करत होता. मात्र घरफोडी करणे अधिक जोखमीचे काम असल्याने त्याने दुचाकी चोरी सुरु केली. विविध जिल्ह्यातून दुचाकी चोरुन त्या चाळीसगावसह इतर परिसरात निम्मे किंमतीत हातोहात विक्री करुन पैसा मिळवत असले. दोन वर्षांपूर्वी चाळीसगाव पोलिसांनी त्याच्याकडून २६ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या होत्या.

नाशिक रेंजचा आवाका

ज्याप्रमाणे गावचा कारभार तालुक्यातून त्याच प्रमाणे शासनदरबारी पाच जिल्ह्यां‍चा कारभार नाशिक विभागातून होतो. यात जळगाव धुळे, नंदुरबार, नगर, नाशिक अशा जिल्ह्यां‍चा समावेश असून नाशिक रेंज म्हणूनही त्याला संबोधले जाते. चोरटा विक्की हा देखील वेगळ्या जिल्‍ह्‍यात थांबून सलग चोरीचे गुन्हे करतो. नंतर अचानक दुसऱ्या जिल्‍ह्यात बस्तान मांडतो. रोटेशन पद्धतीने आपण चोरीचे गुन्हे करत असल्याने पोलिसांच्या तावडीत कधी सापडत नाही, असेही विक्की महाले याने सांगितले.

thief
मोदी-शाहांची नवी खेळी; माजी शिवसैनिकाला मिळणार उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.