Jalgaon News : गिरणा नदीपात्रात बुडाल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

vaibhav patil
vaibhav patilesakal
Updated on

Jalgaon News : अव्हाणे गावातील बारा वर्षीय मुलाचा गिरणी नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.१७) दुपारी तीनला घडली. आज (ता.१८) सकाळी मुलाचा मृतदेह नदीत तरंगताना मिळून आला. वैभव नरेंद्र पाटील असे मयत बालकाचे नाव आहे.

वैभव पाटील आपल्या कुटुंबासह आव्हाणे (ता. जळगाव) गावात वास्तव्याला होता. (12 year old boy dies by drowning in Girna river jalgaon news )

मंगळवारी (ता.१७) शाळेतून परत आल्यावर दुपारी तीनला तो खेळण्यासाठी घराबाहेर पडला. सायंकाळी उशिरापर्यंत वैभव घरी न आल्यामुळे त्याचा नातेवाइकांनी शोध घेतला. परंतु रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही वैभव मिळून आला नाही. यानंतर याप्रकरणी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली.

वैभव बेपत्ता झाल्याची बातमी संपूर्ण गावात पसरली. काही ग्रामस्थांनी वैभव यास गिरणा काठावरील महादेव मंदिरात खेळताना पाहिले होते. म्हणून धीरज पाटील (काका) यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. खेळता-खेळता तो नदी पात्रात तर गेला नसावा शंकेने बुधवारी (ता.१८) रोजी धीरज पाटील व स्वप्नील जोशी यांच्यासह गावातील काही तरुण नदीपात्रात शोध घेत असताना, दुपारी अडीचला गिरणा नदीपात्राच्या वरच्या भागातील पात्रात वैभवचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

vaibhav patil
Jalgaon News : आयुक्तांकडून रस्ते, बायोमायनिंग कामाची पाहणी; थेट डांबरीकरणाच्या लेअरची तपासणी

कृत्रिम खड्यांनी घेतला जीव?

जळगाव तालुक्यातील अव्हाणे हे गाव गिरणा नदीच्या काठावर वसलेले आहे. येथे मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन आणि उपसा करण्यात आल्याने नदीपात्रात मोठ्या संख्येने खड्डे तयार झाले आहे. जळगाव तालुक्यात वाळू माफियांच्या पहिल्या पसंतीचे गाव म्हणून अव्हाणेची ओळख असल्याने गावालगतच्या गिरणा पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा सुरु असतो.

जेसीबी-पोकलॅण्ड लावून वाळू माफियांनी गिरणापात्रात मोठमोठे कृत्रीम डोह (खड्डे) तयार करून टाकले आहे. वर्षभर वाळूचा उपसा करुन झालेले खड्डे पावसाचे पाणी आल्यावर आणि नदीत पाणी सोडल्यावर पाण्याने तुडूंब भरतात, परिणामी नदीपात्रातील खोलीचा अंदाज चुकतो आणि दुर्घटना होत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

vaibhav patil
Jalgaon News : शहरातील घरपट्टी थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव; बड्या थकबाकीदारांवर महापालिकेचा दंडुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.