Jalgaon Electric Bus : एसटीच्या ताफ्यात 121 इलेक्ट्रिक बस; शासनाची मंजुरी

Electric Bus
Electric Bussakal
Updated on

Jalgaon Electric Bus : वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पर्यावरणपूरक १२१ बस जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी जळगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, चोपडा येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. (121 eco friendly electric buses of MSRTC have been approved for district jalgaon news)

एसटी बस कमी असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांत बसच्या फेऱ्या होत नव्हत्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनाकडे नवीन इलेक्ट्रिक बस मिळाव्यात, अशी मागणी केली होती. त्यानुसार शासनाने जिल्ह्यासाठी १२१ बस मंजूर केल्या आहेत. प्रत्येक डेपोला त्या देण्यात येणार आहेत.

त्यात पाचोरा- २१, मुक्ताईनगर- १७, चोपडा- २१, तर जिल्ह्यातील इतर भागांसाठी ६२ बस असतील. जळगाव, पाचोरा, चोपडा व मुक्ताईनगर येथे बस चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आवश्यक एचटी लाइन उपलब्ध करून देण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी जळगाव विभाग नियंत्रकांना दिले आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Electric Bus
Pachora Market Committee Election : राजकीय वणवा...! माघारीसाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मनधरणी

आता बसफेऱ्या वाढणार

जळगाव विभागात नोव्हेंबर २०१९ मध्ये ८३९ बस होत्या, तर सध्या ७२३ बस आहेत. त्यापैकी साधारणतः ५७ बस मोडकळीस निघाल्या आहेत. विभागात बऱ्याचशा बस जुन्या झाल्या असून, त्या वारंवार नादुरुस्त होत असल्याने रस्त्यात ब्रेक डाउन होत असतात. त्यामुळे बस उशिरा धावतात किंवा काही वेळा फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. मात्र, आता नवीन १२१ बस येत असल्याने बसफेऱ्या वाढणार आहेत.

"जिल्ह्यात १२१ पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. प्रस्तावानुसार जिल्ह्यासाठी बसला शासनाने मान्यता दिली आहे. सध्या नवीन शंभर बसची वाढीव मागणीही आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. लवकरच नवीन शंभर बसही जिल्ह्यासाठी उपलब्ध होतील, याची खात्री आहे. त्यामुळे प्रत्येक भागात बसफेऱ्या वाढून जनतेला दिलासा मिळणार आहे." -गुलाबराव पाटील, पालकमंत्री

Electric Bus
Market Committee Election : महाआघाडी, भाजपच्या उमेदवारीकडे लक्ष; ग्रामीण भागात प्रचार शिगेला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()