Jalgaon Milk Adulteration : दुधाचे माहेरघर असलेल्या चाळीसगावात 1300 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

Employees destroying adulterated milk by Bharari team of district administration.
Employees destroying adulterated milk by Bharari team of district administration. esakal
Updated on

Jalgaon Milk Adulteration : एकेकाळी दुधाचे माहेरघर असलेल्या चाळीसगाव शहरात भेसळयुक्त दूध आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील अनेक दूध डेअऱ्यांवर बुधवारी (ता. ९) प्रशासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांमार्फत एकत्रित छापे टाकण्यात आले.

शहरातील स्टेशन रोडवरील नामांकित दूध व दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या आस्थापनांवर तसेच दूध सागर मार्ग परिसरातील दूध डेअऱ्यांवर अचानक छापा टाकण्यात आला. (1300 liters of adulterated milk destroyed in Chalisgaon Jalgaon Milk Adulteration news)

दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेल्या भरारी पथकाने शहरातील दूध डेअरी व दूध संकलन केंद्रांमध्ये जाऊन दुधाच्या नमुन्यांची तपासणी केली.

तपासणीत अनेक ठिकाणी पाणी मिश्रित भेसळयुक्त दूध आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या या भरारी पथकाने दुपारी दोनपर्यंत १ हजार ३८२ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले आहे. मात्र भेसळयुक्त दूध आढळलेल्या डेअरी मालकांवर आस्थापनांवर कुठली कारवाई करण्यात आली, याची माहिती अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेली नाही.

या भरारी पथकात अन्न व औषध प्रशासन विभाग, कृषी, पशुसंवर्धन मत्स्य, दुग्ध विकास विभाग, वजनमाप शास्त्र विभाग तसेच स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Employees destroying adulterated milk by Bharari team of district administration.
Spices Adulteration : सावधान ! मसाल्याच्या पदार्थांत वाढतेय भेसळ

ही कारवाई अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त स. कृ. कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्‍यामकांत पाटील, उपनियंत्रक वजनमाप शास्त्र विभागाचे बी. जी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा दुग्धविकास अधिकारी वाय. आर. नागरे यांच्या पथकात संतोष कांबळे व इतर विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या पुढे दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी ही मोहिम सुरू राहणार असल्याची माहिती वाय. आर. नागरे यांनी दिली आहे.

दुधात केमिकल नव्हे; प्रमाणापेक्षा जास्त पाणी

दूध व दुग्धजन्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गठीत केलेल्या पथकाने बुधवारी (ता. ९) चाळीसगाव शहरातील डेअऱ्यांवर छापे टाकले. या कारवाईमध्ये अनेक ठिकाणी भेसळयुक्त दूध आढळून आले.

दुधात प्रमाणापेक्षा जास्त पाणी आढळून आल्याने हजारो लिटर दूध नष्ट करण्यात आले. मात्र या दुधात युरिया किंवा अन्य केमिकल पदार्थ आढळले नसल्याचे प्रथमदर्शी दिसून आले आहे. परंतु दुधात मिश्रित केलेले पाणी कसे आहे, पाण्याची गुणवत्ता काय? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहे.

Employees destroying adulterated milk by Bharari team of district administration.
Adulteration in Jaggery: असा गुळ असतो शुद्ध; बाकीची सगळी भेसळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.