Jalgaon Rain News : पाळधीत चार तासात 144 मिलीमिटर पाउस; मुसळधार पावसाने अनेक भागात पाणी

Jalgaon Rain News : पाळधीत चार तासात 144 मिलीमिटर पाउस; मुसळधार पावसाने अनेक भागात पाणी
Updated on

Jalgaon Rain News : शहरासह पाळधी येथे शनिवारी (ता. २३) मध्यरात्रीनंतर मुसळधार पाउस झाला. पाळधीत चार तासात १४४ मिलीमिटर पाउस झाल्याने अनेक घरांत, दुकानांत पाणी शिरून नुकसान झाले. पोलिस ठाण्यातही पाणी शिरल्याने पोलिसांचे हाल झाले.

मध्यरात्री अकरानंतर सुरू झालेल्या धूव्वांधार पावसाने शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचले. जुने जळगाव, शंकरअप्पानगर, कालिकामाता मंदिर, गोपाळपूरा आदी भागात पाणी साचले आहे. गोपाळपूरा परिसरात नाल्याला आलेल्या पुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून नूकसान झाले आहे. (144 mm of rain in 4 hours during Paldhi jalgaon news)

पालकमंत्र्यांकडून पाहणी

पाळधी (ता. धरणगाव) येथे मध्यरात्री झालेल्या अचानक पावसामुळे नाल्याला पूर आला. पोलीस चौकीमध्ये पाणी शिरल्याने पोलिसांना धावपळ करावी लागली. पोलिसांना रात्र जागून काढावी लागली. पाऊस अचानक सुरू झाला, त्यावेळी नागरीक झोपेत होते. हा पाऊस साधारण चार तासांपर्यंत एकसारखा सुरू होता.

त्यामुळे नाल्याला पूर आला. या पुराचे पाणी दुकानात शिरल्याने अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले. सकाळी उठल्यावर दुकानदारांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली. पाण्याची पातळी पाहून ते फक्त पाहात उभे होते.

Jalgaon Rain News : पाळधीत चार तासात 144 मिलीमिटर पाउस; मुसळधार पावसाने अनेक भागात पाणी
Jalgaon Rain News : बोदवड, जामनेरला परतीच्या पावसाने झोडपले! बोरी, खडका नदीला पूर; सात्रीचा संपर्क तुटला

सकाळी पाणी ओसरल्यानंतर त्यांनी नुकसानीचा अंदाज घेतला. त्यात किराणा, कृषी केंद्र, शिंपीची दुकाने, मोबाईल दुकानदार यांचे अतोनात नुकसान झाले. पोलीस चौकीमध्ये पाणी शिरल्याने त्यांनाही आपले दप्तर वाचविण्यासाठी धावपळ करावी लागली. त्यांच्या गाडीत पाणी शिरल्याने तीही बंद झाली.

महामार्गावरील वाहतूक ठप्प

महामार्गावरील वाहतूकही या पावसामुळे ठप्प झाली होती. उड्डाण पुलाखालील बोगद्यात पाणी साचल्याने गावात येणारी वाहतूक ठप्प झाली होती. शेतातील पिके आडवी झाली असून, शेतकरी वर्गाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, रविवारी (ता. २४) सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

Jalgaon Rain News : पाळधीत चार तासात 144 मिलीमिटर पाउस; मुसळधार पावसाने अनेक भागात पाणी
Jalgaon Rain News : एरंडोल तालुक्यात पावसाचा हाहाकार; पिंपळकोठा, पिंप्रीसह 4 गावांत ढगफुटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()