जळगाव : शहरासह तालुक्यात शासनाच्या आदेशानुसार नवीन सजे, मंडलांची स्थापना करण्याचे कामे महसूल विभागातर्फे जिल्ह्यात सुरू आहेत. (146 seats 24 mandals increased in district jalgaon news)
जिल्ह्यात पूर्वी ५०१ सजे होते. त्यात १४६ सजे वाढले आहेत. यामुळे आता ६४७ सजे झाली आहेत. पूर्वी ८६ महसुली मंडले होती. त्यात २४ मंडलांची वाढ होऊन ती ११० झाली आहेत. सजे व मंडले वाढीमुळे महसूल विभागाला संबंधित परिसराच्या नागरिकांना दाखले देणे सोईचे होणार असून, नवीन परिसराला महसुली दर्जाही मिळणार आहे. त्यानुसार महसूल वसुली होणार आहे. नवीन वाढलेले सजे, मंडलात काम करण्यासाठी २०८ पदांची लवकरच भरती होणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.
पूर्वीच्या सजे, मंडलांची रचना सुमारे ५० वर्षांपूर्वीची आहे. तेव्हाचा परिसर, लोकसंख्येचा विचार करता त्यात पाच ते दहापट वाढ झाली आहे. त्यामानाने सजे, मंडलांची संख्या कमी होती. त्या परिसरातील एकाच तलाठी, मंडलाधिकाऱ्याकडे अनेक गावांचा कार्यभार होता. यामुळे महसुली कामे करताना ओढाताण करावी लागत असे.
यामुळे शासनाच्या आदेशानुसार नवीन सजे, मंडलांची निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. २०८ पदांची भरती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. शासन राज्यस्तरावर एकावेळी भरतीची प्रक्रिया राबविणार आहे.
जळगाव शहर व तालुक्याचा विचार केल्यास एकूण ८७ गावे आहेत. तालुक्यात पूर्वी ३२ सजे होती. आता ४६ झाली आहेत. पूर्वी सहा मंडले होती, ती आता आठ झाली आहेत.
हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार
जळगाव महानगर, मेहरूण, पिंप्राळा या ठिकाणी प्रत्येकी तीन गावांची, तर असोदा, नशिराबाद येथे प्रत्येकी दोन गावे नवीन निर्माण होतील, अशी एकूण १३ गावे जळगाव शहरात नव्याने तयार होतील. वरील परिसरातील गावात कोणकोणता एरिया जोडायचा, त्यांना महसुली दर्जा कसा द्यायचा? याबाबत भूमीअभिलेख विभागाच्या उपअधीक्षकांकडे काम सुरू आहे.
सजाचे नाव कंसात चर्तुसीमा
भोलाणे (भोलाणे), सुजदे (सुजदे, देऊळवाडे, नांद्रा खुर्द), कानळदा (कानळदा), जळगाव खुर्द (जळगाव खुर्द, खिर्डी, तिघ्रे), बेळी (बेळी, निमगाव बुद्रुक, भागपूर), चिंचोली (चिंचोली, पिंपळे), धानवड (धानवड, देव्हारी), म्हसावद (म्हसावद, वाकडी, कुऱ्हाडदे, लमांजन), शिरसोली प्र. न. (शिरसोली प्र. न., दापोरे), शिरसोली प्र. बो. (शिरसोली प्र. बो.), विटनेर (विटनेर), पाथरी (पाथरी, वडली, डोमगाव, बोरनार),
जवखेडे (जवखेडे, लोणवाडी खुर्द व बुद्रुक, सुभाषवाडी), वावडदे (वावडदे, बिलखेडे, बिलवाडी, रामदेववाडी), जळके (जळके, वसंतवाडी, वराड बुद्रुक, खुर्द), भोकर (भोकर, भादली खुर्द), विदगाव (विदगाव, डिकसाई , रिधूर), किनोद (किनोद, कठोरा, फुपणी, देवगाव), आमोदे बुद्रुक (आमोदे बुद्रुक, जामोद, पळसोद, गाढोदा), धामणगाव (धामणगाव आवार, तुरखेडे, खापरखेडा), करंज (करंज, धानोरे खुर्द, सावेखडे खुर्द, आमोद खुर्द, घार्डी).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.