Jalgaon News : फुकट्या प्रवाशांकडून 15 लाखांचा दंड वसूल; एकाच दिवशी रेल्वे गाड्यांची तपासणी

15 lakh fine collected from passengers who travel through railway without ticket
15 lakh fine collected from passengers who travel through railway without ticketesakal
Updated on

जळगाव : भुसावळ विभागीय रेल्वे विभागाने रेल्वेत अचानक तिकीट तपासणी मोहीम राबविली. त्यात १५ लाख ४४ हजारांचा दंड फुकट्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आला. (15 lakh fine collected from passengers who travel through railway without ticket bhusawal jalgaon news)

रेल्वे प्रबंधक एस. एस. केडिया यांच्या अध्यक्षतेखाली व वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभाग व आरपीएफ यांच्यातर्फे तिकीट तपासणी मोहीम यशस्वी झाली.

इगतपुरी-भुसावळ, भुसावळ ते अमरावती, खंडवा-भुसावळ विभागात दोन अधिकारी, तिकीट तपासणी कर्मचारी, आरपीएफ कर्मचारी, अशा एकूण ४७ पथकांनी सुमारे ९४ गाड्यांमध्ये अचानक तपासणी केली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

15 lakh fine collected from passengers who travel through railway without ticket
Jalgaon Accident News : क्रेनच्या धडकेत महिला जागीच ठार; MIDCतील घटना

एका दिवसात दोन हजार ४७८ फुकट्या प्रवाशांना पकडून १५ लाख ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

"प्रवाशांनी योग्य तिकीट काढून योग्य वर्गाच्या डब्यातच प्रवास करावा. तुम्हाला तिकिटासाठी लागणाऱ्या लांबलचक रांगेपासून स्वतःला वाचवायचे असेल, तर रेल्वेचे ‘यूटीएस’ ॲप डाउनलोड करून वापर करा." -शिवराज मानसपुरे, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक

15 lakh fine collected from passengers who travel through railway without ticket
Jalgaon News : नकार देऊनही शेडची उभारणी; महासभेत आयुक्तांचे उत्तर केवळ हवेतच?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()