Jalgaon News : चाळीसगावातून 15 लाखांचे पाइप लंपास

crime news
crime newsesakal
Updated on

चाळीसगाव (जि. जळगाव) : शहराला लागून असलेल्या खडकीस्थित एमआयडीसीत पाइपलाइन टाकण्याचे काम संत सतरामदास इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून सुरू आहे.

तेथील वॉटर ट्रिटमेंट प्लांटसमोरून चोरट्यांनी सुमारे १५ लाख रूपये किमतीचे २०० प्लास्टिक पाइप (Pipe) लंपास केल्याची घटना घडली आहे. (15 lakhs of pipes theft from Chalisgaon jalgaon news)

या प्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील एमआयडीसीमध्ये संत सतरामदास इन्फ्रास्ट्र्नचर कंपनीने रस्ता व पाणीपुरवठा करण्याचे काम घेतले आहे. पाइपलाइनचे काम सुरू करण्यासाठी जिंदाल कंपनीचे सुमारे ३६१ पाइप गुजरात येथून मागवले होते.

हे पाईप ८ फेब्रुवारीला दुपारी दोनच्या सुमारास एमआयडीसीमधील वॉटर ट्रिटमेंट प्लांटसमोर मोकळ्या जागेत उतरवले होते. कंपनीचे अभियंता सुनील रामदास पवार हे गुरुवारी (ता. १६) सकाळी सातच्या सुमारास साइटवर काम पाहण्यास गेले असता त्या ठिकाणी काही पाइप दिसले नाहीत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

crime news
Jalgaon Election 2023 : महापालिकेत निवडणुकीपूर्वीच राजकीय घमासान; सत्ताधारी संतप्त

पाइपांची मोजणी केली असता सुमारे २०० पाइप कमी आढळले. त्यामुळे या पाइपांबाबत आसपास काम करणाऱ्या लोकांना विचारणा केली असता कोणी काही माहिती दिली नाही. त्यामुळे जिंदाल कंपनीचे १८.१५फुटांचे १५ लाख रूपये सुमारे २०० पाइप ८ ते १६ फेब्रुवारीच्या दरम्यान चोरीला गेल्याची फिर्याद कंपनीचे अभियंता पवार यांनी दिल्यावरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

crime news
Jalgaon News : मनपा पदाधिकांऱ्याचा राजीनामा मागण्याचा पोकळेंना अधिकार काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.