Wild Animal News : दळवेल परिसरात वन्य प्राण्यांच्या हल्यात 15 कोकरु ठार

Lambs killed by wild Animals
Lambs killed by wild Animalsesakal
Updated on

पारोळा : तालुक्यातील दळवेल शिवारात रात्री थांबलेल्या मेंढ्यांच्या कळपावर वन्यप्राण्यांनी हल्ला चढवून २० कोकरांचा बळी घेतल्याने, मेंढपाळांमध्ये एकच हाहाकार उडाला आहे.

वन कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता. ७) पहाटेच्या सुमारास संभाजी नामदेव पाटील (रा. दळवेल) यांच्या शेतात उतरलेल्या मेंढपाळांच्या कळपावर वन्यप्राण्यांनी हल्ला चढवून १५ कोकरे जागीच ठार, तर पाच गायब झालेली आढळली. घटनास्थळी आढळलेल्या पायांच्या ठशांवरून कोल्हे किंवा लांडगे असण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

धुळे जिल्ह्यातील निमडाळे येथील दादा टिळे यांची पाच कोकरे, बंडू टिळे यांची पाच कोकरे व ज्ञानेश्वर लाला कोळकर यांची दहा कोकरे अशी एकूण २० कोकरे मृत व गायब झालेली आहेत.(15 Lambs Killed in wild animal Attack in dalvel Jalgaon News)

Lambs killed by wild Animals
Crime News : फाईल्ससह रक्ताने माखलेला चाकु भोईटेंच्या घरात केला प्लांट

दळवेल शिवाराच्या लगत वन विभागाची हद्द सुरू होते. वन विभागाचा खूप मोठा परिसर व्यापलेला असल्याने या भागातून नेहमी वन्यप्राण्यांचा वावर असतो. बऱ्याचच परिसरात शेतीचे व पशुधनाचे नुकसानदेखील झालेले आहे. त्यामुळे या परिसरात वन विभागाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वन विभागास मिळालेल्या माहितीनुसार वनसंरक्षक रोहिणी सूर्यवंशी, वनसंरक्षक सविता पाटील, वनपाल अनिल बोराडे, वनमजूर नाना संदानशिव, विपुल सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत मेंढ्यांच्या कोकरांचे शवविच्छेदन पारोळा येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. योगेश देशमुख यांनी केले. या वेळी शेतकरी संभाजी पाटील व गंभीर पाटील उपस्थित होते. मृत कोकरांची अंदाजे किंमत २५ हजार रुपये असावी, असे सांगण्यात आले.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मेंढपाळांची कोकरे ठार झाल्याची घटना दुर्दैवी आहे. पंचनामा करण्यात आला असून, वरिष्ठांकडे याबाबतचा अहवाल पाठविला जाणार आहे.

-श्यामकांत देसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, पारोळा

Lambs killed by wild Animals
Jalgaon : बापरे..! जिल्ह्यात ४२० जणांना चावले पिसाळलेले कुत्रे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()