Jalgaon News : वर्सी महोत्सवात विदेशातूनही सिंधी भाविक येणार; तिसऱ्या दिवशी दुकाने बंद

Decorations came to the holy shrine of the Sindhi brothers. Adorned Utsav Utsav Murti in the photograph.
Decorations came to the holy shrine of the Sindhi brothers. Adorned Utsav Utsav Murti in the photograph.esakal
Updated on

Jalgaon News : येथील सिंधी कॉलनीतील (संत कंवररामनगर) सेवा मंडळ परिसरात अमर शहीद संत कंवररामसाहेब यांच्या ६६ वा, संत बाबा हरदासराम साहेब यांच्या ४६ वा, बाबा गेलाराम साहेब यांच्या १५ वा वर्सी महोत्सवाला १ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे.

भारतासह पाकिस्तान व अन्य देशांमधून हजारो भाविक जळगावमध्ये यानिमित्ताने दाखल होणार आहेत. (15 Sindhi Varsi Festival started from 1 November jalgaon news)

अमर संत शहीद यांचा जन्म (सिंध) पाकिस्तानातील जरबार येथे झाला. संत हरदासराम (गोधडीवाले बाबा) हे जेव्हा सिंध प्रांतातून अमरावतीला आले होते, तेव्हा त्यांना भाविकांनी जळगावमध्ये येण्याचा आग्रह धरला होता. अमर शहीद संत कंवरराम यांचा यंदा ६६ वा वर्सी महोत्सव आहे.

त्यांचा पहिला वर्सी महोत्सव १९५७ मध्ये झाला. बाबांचा जन्म १३ एप्रिल १८८५ मध्ये जरबार (पाकिस्तान) येथे झाला. त्यांचे शिष्य बाबा हरदासराम यांनी जळगावात येऊन संत कंवराम यांच्या पथमार्ग शेवटपर्यंत चालत राहून आपले सेवाकार्य जळगावी राहून पूर्ण केले.

१९५७ पासून महोत्सव

संत कंवरराम यांचे शिष्य बाबा हरदासराम होते. संत हरदासराम यांनीच आपल्या गुरूंचा प्रथम वर्सी महोत्सव १९५७ पासून सुरू केला. संत हरदासराम यांचे १९७७ मध्ये महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांचे शिष्य संत गेलाराम बाबा यांनी आपल्या गुरूंचा वर्सी महोत्सव १९७८ पासून केला.

Decorations came to the holy shrine of the Sindhi brothers. Adorned Utsav Utsav Murti in the photograph.
Jalgaon News : शेळगाव बॅरेजला मिळाली आणखी 12 हेक्टर जमीन; 100 टक्के पाणी साठणार

संत हरदासरामसाहेब (गोधडीवाले बाबा) यांचा जन्म पाकिस्तानातील सिंध प्रांतातील हलाणी येथे झाला. त्यांची यंदा ४६ वा वर्सी महोत्सव आहे. १९७८ मध्ये त्यांचा पहिला वर्सी महोत्सव घेण्यात आला होता. पुढे १९५४-५५ मध्ये ते सिंध प्रांतातून अमरावती येथे आले. त्यानंतर १९५६-१९५० मध्ये ते जळगावला आले. अंगावर गोधडी असल्याने त्यांना भाविक गोधडीवाले बाबा म्हणतात.

महोत्सवातील चारदिवसीय कार्यक्रम

वर्सी महोत्सव हा संत कंवरराम यांच्या तिथीनुसार साजरा होतो. इतर दोन्ही संतांचाही त्यांच्या तिथीला महोत्सव साजरा होतो. एक नोव्हेंबरला महोत्सव सुरू होईल. २ नोव्हेंबरला धार्मिक विधी, ३ नोव्हेंबरला भोग साहेब, ४ नोव्हेंबरला पल्लवसाहेब होईल. ३ नोव्हेंबरला सिंधी बांधवांची दुकाने बंद असतील.

Decorations came to the holy shrine of the Sindhi brothers. Adorned Utsav Utsav Murti in the photograph.
Jalgaon News : भरपाई मिळत नसल्याने केळी विम्याकडे पाठ; मुदत फक्त 3 दिवस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.