Raver Flood News : सातही मंडळांत दुसऱ्यांदा अतिवृष्टी; रावेर तालुक्यात 150 घरांची पडझड

Rainwater accumulated in cotton fields due to heavy rainfall and
Damage due to house collapse due to heavy rain
Rainwater accumulated in cotton fields due to heavy rainfall and Damage due to house collapse due to heavy rain esakal
Updated on

Raver Flood News : तालुक्यात बुधवारी (ता. १९) सर्वच ७ महसूल मंडळात दुसऱ्यांदा अतिवृष्टी होऊन १५१ घरांची पडझड झाली असून, ४४२ घरांमधील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.

या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ६२ हेक्टर पिकांचे सुमारे २ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, अतिवृष्टीमुळे १६ गावांमधील ४२ हेक्टर जमीन खरबडून मोठे नुकसान झाले आहे.
शहरासह तालुक्यात बुधवारी (ता. १९) सर्वच भागात दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. (151 houses collapsed due to heavy rains for second time in 7 revenue circles raver floods jalgaon news)

तालुक्यात यावर्षी दुसऱ्यांदा सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टीची (६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची) नोंद झाली. विविध महसूल मंडळात बुधवारी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढील प्रमाणे : रावेर - ९८, खानापूर - ७३, ऐनपूर -७८, खिर्डी - ८३, निंभोरा -७९, सावदा - ९४, खिरोदा प्र यावल -१०७. तालुक्यात बुधवारी सरासरी ८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण २५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

अतिवृष्टीमुळे तालुक्यातील २० गावांतील १५१ घरांची पडझड झाली आहे. त्यात प्रामुख्याने खिर्डी बुद्रुक -२५, खिर्डी खुर्द - २६, विवरे खुर्द ३०, वडगाव -२५, वाघोदा बुद्रुक - ८, केऱ्हाळे बुद्रुक - ७ येथील घरांचा समावेश आहे. नदीला नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झालेल्या २० गावांमध्ये ४४२ घरांचा समावेश आहे.

यात वाघोदा बुद्रुक येथे सर्वाधिक म्हणजे २१६ घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून, त्या पाठोपाठ खिर्डी बुद्रुक - २०, खिर्डी खुर्द - १८, सावदा -६४, विवरे बुद्रुक -१२, विवरे खुर्द - १५, वडगाव - २०, केऱ्हाळे बुद्रुक - २५, चिनावल - १५ या गावांतील घरांचा प्रामुख्याने समावेश आहे.

Rainwater accumulated in cotton fields due to heavy rainfall and
Damage due to house collapse due to heavy rain
Kolhapur Flood : कोल्हापुरात पूरसदृश परिस्थिती; 59 बंधारे पाण्याखाली, आज-उद्या Yellow Alert

अधिकाऱ्यांची तत्परता

परिसरात बुधवारी दिवसभर पाऊस सुरू असल्याने तहसीलदार बी. ए. कापसे, परीविक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्यासह सर्वच मंडळाधिकारी आणि तलाठी सज्ज होते.

येथील पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्यासह सर्वच पोलिस अधिकाऱ्यांनी पुरामुळे कोठेही दुर्घटना घडू नये म्हणून पोलिस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांसह काळजी घेतली. रात्री उशिरापर्यंत सर्वच अधिकारी विविध भागात फिरून पाहणी करत होते.

अतिवृष्टीत तालुक्यातील २४ गावांमधील १२२ शेतकऱ्यांचे ६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे १ कोटी ८७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर अतिवृष्टीमुळे शेतातील पिके आणि माती वाहून जाऊन १६ गावांमधील १३१ शेतकऱ्यांचे ४२ हेक्टर शेतीवरील सुमारे ४२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

एसडीआरएफची तुकडी दाखल

दरम्यान, तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीचा संदेश मंत्रालयात पोहोचताच तेथील आदेशावरून धुळे येथील एसडीआरएफचे २५ जवान रात्री उशिरा शहरात पोहोचले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rainwater accumulated in cotton fields due to heavy rainfall and
Damage due to house collapse due to heavy rain
Jalgaon Flood News : पावसाचा हाहाकार! फैजपूरच्या गावठाणाला महापुराचा वेढा; घरांमध्ये शिरले पाणी

पुढील आदेशापर्यंत ते रावेर येथे राहणार असून, तालुक्यातील ग्रामस्थांनी पूर परिस्थिती निर्माण झाल्यास महसूल प्रशासनाकडे मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन महसूल विभागाने केले आहे. रावेर आणि सावदा येथे प्रत्येकी एक निवारागृह पूरग्रस्तांसाठी सुरू करण्यात आल्याची माहिती ही तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली.

शाळांना सुट्टी अन् पावसाची दडी

मुसळधार पाऊस पडल्याने बुधवारी दिवसभर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचताना अडचणीचा सामना करावा लागला. पडत्या पावसात आणि कमरेइतक्या पाण्यातून विद्यार्थी आपापल्या घरी पोहोचले.

सुदैवाने कोठेही दुर्घटना झाली नाही. या पार्श्वभूमीवर पुन्हा अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी रावेर आणि यावल तालुक्यातील सर्वच प्राथमिक आणि माध्यमिक शाळा गुरुवारी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

मात्र दिवसभर अतिवृष्टी तर सोडाच पण साधा पाऊसही झाला नाही. अतिवृष्टी काळात शाळा बंद ठेवण्याचे अधिकार प्रशासनाने स्थानिक पातळीवर द्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.

Rainwater accumulated in cotton fields due to heavy rainfall and
Damage due to house collapse due to heavy rain
Raver Flood News : रावेरमधील अनेक गावांचा संपर्क तुटला; अजंदेजवळ कार वाहून गेली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.