Jalgaon News : अमळनेरला विभागीय स्पर्धेत 162 क्रीडापटूंचा सहभाग

Gayatri Bhadane while guiding. Neighbor Dr. S. J. Shaikh, Prof. Shyam Pawar etc.
Gayatri Bhadane while guiding. Neighbor Dr. S. J. Shaikh, Prof. Shyam Pawar etc.esakal
Updated on

अमळनेर (जि. जळगाव) : खानदेश गौरव कै. रुक्मिणीताई स्मृती चषक क्रीडा व बौद्धिक स्पर्धा--२०२२ या अंतर्गत येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात संस्थेतील सात शाळांमधील १६२ क्रीडा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. रुख्मिणीताई महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. शेख अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. श्याम पवार यांनी भूषविले. ( 162 sportspersons participate in Amalnerala regional competition Jalgaon News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Gayatri Bhadane while guiding. Neighbor Dr. S. J. Shaikh, Prof. Shyam Pawar etc.
Gram Panchayat Election : गोळवाडला 25 वर्षांनंतर निवडणूक; बिनविरोधची परंपरा खंडीत!

या वेळी वेले विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. ए. पाटील, फापोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. बी. पाटील, पिंपळे विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. टी. शिंदे, आर्मी स्कूलचे शरद पाटील आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका गायत्री भदाने यांनी क्रीडा व बौद्धिक स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय प्रा. सुरेश पाटील यांनी केला. के. डी. महंत यांनी सूत्रसंचालन यांनी केले. प्रा. सुनील पाटील यांनी आभार मानले.

दरम्यान, अंतिम स्पर्धा नवलनगर (जि. धुळे) येथे होणार असून, या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष विजय नवल पाटील हे अध्यक्षस्थानी राहतील. धुळे पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोकुळ बोरसे, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा भाजुमोचे प्रदेश सचिव अनिकेत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, एस. एन. पाटील, बी. टी. पाटील, योगेश पाटील, मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, नवलनगर विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या.

Gayatri Bhadane while guiding. Neighbor Dr. S. J. Shaikh, Prof. Shyam Pawar etc.
Nandurbar News : 14 वर्षीय हृदयाने घोडेस्वारी करत गाठले सारंगखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.