Jalgaon Dengue Disease : शिरसोलीत तरूणाला डेंग्युचा डंख; उपचारादरम्यान मृत्यु

Dengue
Dengue esakal
Updated on

Jalgaon Dengue Disease : शहरापासुन अवघ्या पंधरा किलोमिटरवर असलेल्या शिरसोली या गावात डेंग्यु आजाराने थैमान घातले असून, एका एकोणीस वर्षीय तरुणाचा आजाराशी लढता-लढता मृत्यु ओढवला आहे.

देवेंद्र विकास बारी (रा. शिरसोली प्र. बो. ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून, गुरुवारी (ता. १४) पहाटे तीनला खासगी रुग्णालयात देवेंद्रचा मृत्यु झाला.

शिरसोली या सर्वच बाबतीत विकसीत आणि अग्रेसर असलेल्या व शहरापासुन सर्वाधीक जवळ असलेल्या गावात डेंग्युची बाधा होवुन तरुणाचा जीव वाचता आला नाही, हे ग्रामीण आरोग्य विभाग, जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद प्रशासन आणि जिल्‍हा प्रशासनाला आरसा दाखवण्यास पुरेसे कारण आहे. (19 year old youth died due to dengue in shirsoli jalgaon news )

देवेंद्र बारी हा तरुण बारीनगरातील पाण्याच्या टाकीजवळ कुटूंबीयासह वास्तव्यास होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी असल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आजाराला गुणच येत नसल्याने आणि ताप उतरत नसल्याने डॉक्टरांनी रक्त लघवीसह सर्व तपासण्या सुरु केल्या.

अखेर तपासात त्याला डेंग्यू आजाराचे निदान झाले. प्रकृती खालावल्याने देवेंद्रला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, देवेंद्रला वाचविण्यात त्यांना अपयश आले.

त्याच्या मृत्यूचे वृत्त समजताच कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. मयत देवेंद्र हा दोन बहिणींचा एकुलता लाडका भाऊ होता. वडीलांना इलेक्ट्रीक कामात मदत करुन कुटूंबाला हातभार लावत होता.

ग्रामस्थांचा संताप

देवेंद्रच्या मृत्युची बातमी गावात कळताच ग्रामस्थांना धक्का बसला. गावातील आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय यंत्रणेवर ग्रामस्थांनी तोंडसुख घेत संतापाला वाट करुन दिली. गावामध्ये दोन आरोग्य उपकेंद्र व फिरता आयुर्वेदिक दवाखानादेखील आहे. डेंग्युच्या मृत्युमूळे गावात चलबिचल वाढताच ग्रामपंचायतकडून औषध फवारणीसह साफसफाई सुरु करण्यात आली. गावात स्वच्छता मोहिम राबवली जात असल्याचेही सरपंचांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dengue
Jalgaon Dengue Disease : शहरात डेंग्युसदृश्‍य 161 रूग्ण; 40 जणांचे अहवाल प्रतिक्षेत, काळजी घेण्याचे आवाहन

पाण्याच्या टाकी खालीच पैदास केंद्र

मयत देवेंद्र बारी वास्तव्यास असलेल्या परिसरात पाण्याच्या टाकी खालीच घाणीचे साम्राज्य असून, डासांचे पैदास केंद्रच असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. डेंग्युचा डास स्वच्छ पाण्यातच जन्म घेत असला, तरीही देवेंद्रचे घर असलेल्या परिसरात पाण्याच्या टाकीमुळे लिकेज आणि स्वच्छ पाणी साचत असल्याचेही सांगण्यात आले.

डेंग्यूचा प्रादुर्भाव जानेवारी ते सप्टेंबर :

डेंग्यु बाधीत रुग्ण : १६७

तीव्र ते अतितीव्र लक्षणे : ०९ (रुग्ण)

खासगी रुग्णालयाचा डाटा गुलदस्त्यात

जोपर्यंत एखादा रुग्ण दगावत नाही किंवा डेंग्युसारख्या आजाराने तो मेलाय याचा बोभाटा होत नाही, तोवर यंत्रणा जागची हलतसुद्धा नाही. मलेरीया आणि डेंग्यु निर्मुलन कार्यक्रमांतर्गत स्थानिक प्रशासन, मलेरीया विभागाचे वर्षांचे कॅलेंडर ठरलेले असते. तरीसुद्धा ही यंत्रणा कुणाच्या तरी मरणाची वाट पाहते, हे सर्वाधीक क्लेशदायी आहे.

त्यात शहर आणि तालूक्यातील बहुतांश रुग्ण खासगी, गल्लीतील डॅाक्टर किंवा जास्तच बाधा असली तर शहरातील मोठ्या रुग्णालयात उपचार घेवून बरे होतात. डेंग्यु बाधीत रुग्णांबाबत खासगी डॉक्टरांचा डे-टू-डे डाटा संकलनाची यंत्रणाच आरोग्य विभागाकडे नसल्याचे सांगण्यात आले.

Dengue
Dengue Fever Prevention : डेंग्यू-व्हायरल तापात रामबाण उपाय ठरतील हे 5 मसाले

आणखी तीन बालके शिरसोलीत डेंग्यूबाधित

शिरसोली येथे डेंग्यूमुळे देवेंद्र बारी या तरुणाचा मृत्यू झाल्याने सरकारी यंत्रणेला खडबडून जाग आली. गुरुवारी (ता. १४) दुपारी आशा-अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गावात सर्वेक्षण सुरु करण्यात आले. त्यामध्ये दिवसभरात आणखी तीन बालके डेंग्यूबाधित असल्याचा अहवाल आला असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तरुणाच्या मृत्युने ग्रामस्थांत आरोग्य यंत्रणेविरुद्ध संताप व्यक्त होत असल्याने यंत्रणेने वेळ वाया न घालवता कामाला सुरवात केली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण व म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश अग्रवाल यांनी गावात भेट देऊन माहिती घेतली.

तसेच, आशा- अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गावात सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. या सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार गावात आणखी तीन बालके डेंग्यू बाधित आहेत. यात मंदार प्रणय सोनवणे (वय १४, रा. शिरसोली प्र. न.) याला बुधवारी (ता. १३) जळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल केलेले असून, त्याचा डेंग्यूचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

तसेच, चंद्रकांत ज्ञानेश्‍वर पाटील (वय १६) हा बालकसुद्धा दोन दिवसांपूर्वी बाधित झाला. तर, गुरुवारी त्याची लहान बहीण वेदीका ज्ञानेश्‍वर पाटील (वय १४) हिचादेखील अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

Dengue
Dengue Symptoms In Child : डेंगीची लक्षणे लहान मुलांमध्‍ये वेगळी, वेळीच ओळखून व्हा सावध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.