Jalgaon Sand Crime News : जिल्ह्यात जूनपासून वाळूउपसा बंद आहे. अवैध वाळूउपशावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अंकुश लावला असला तरी वाळू चोरीच्या घटना थांबत नाहीत.
अवैध वाळूउपसा करून वाहतूक करणाऱ्यावर दंडात्मक व अटकेची कारवाई करण्यात आली.(2 crore fine in illegal sand extraction case jalgaon news)
सात महिन्यांत जळगाव जिल्ह्यात ४२७ प्रकरणांत पाच कोटी ५९ लाखांचा दंड आकारण्यात आला. त्यापैकी दोन कोटी ३३ लाखाचा दंड वसूल झाला. ६२ गुन्हे दाखल झाले. तर ११५ जणांना अटक झाली. पाच कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले. २४३ वाहने जप्त झाली.
अवैध वाळूउपशा प्रकरणात दंड वसुलीत जळगाव जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात, संशयितांना अटक करण्यात व वाहने जप्त करण्यात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. फक्त वाळूच्या अवैध उत्खनन प्रकरणी ३० जून ते १५ ऑक्टोबर यादरम्यान ही कारवाई करण्यात आली.
आकडेवारी अशी
जिल्हा-प्रकरणे-- आकारलेला दंड-वसूल- गुन्हे दाखल-- अटक-- हल्ले प्रकरण--जप्त वाहने (आकडे कोटीत)
जळगाव--४२७--५५९.३१--२३३.१२--६२--११५--५--२४३
अहमदनगर--२७८--४६३.८३--२२७.३६--५०--०--०-७७
नाशिक--८८--२०३.२७--७३.२६--१४--०--०--२८
धुळे--३३३--४४६.९१--३०९.६२--१५--७--२-७
नंदुरबार--९२--२१०.८--११९.१--५--२--०--२६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.