Jalgaon News : पाझंरापोळ रस्त्यावरील 2 मजली अतिक्रमणावर हातोडा; शहरात मोठी धडक कारवाई

Municipal employees breaking encroachment by JCB.
Municipal employees breaking encroachment by JCB. esakal
Updated on

Jalgaon News : शहारातील नेरीनाका स्मशानभूमीजवळील पाझंरापोळ संस्थेजवळील वहिवाट रस्त्यावर गेल्या २० वर्षांपासून असलेले दोन मजली इमारत, आरसीसी मोठे घर व पत्र्यांचे गुदाम शेडचे अतिक्रमणावर महापालिकेने गुरुवारी (ता. ४) पाडले. या वेळी महापालिकेचे अधिकाऱ्यांसमवेत प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. (2 floor encroachment on Panjrapole road demolished jalgaon news)

शहरातील वहिवाट रस्त्यावरील गट नंबर १६३/१ मध्ये पांझरापोळ संस्थेच्या भिंतीपासून १५ फूट अंतरावर रामचंद्र कोल्हे, यशवंत कोल्हे, भूषण कोल्हे, लिना खाचणे, विष्णू कोल्हे यांचे अनधिकृत बांधकाम असल्याची महापालिकेकडे तक्रार आली होती.

त्यानुसार महापालिकेच्या नगरचना विभागाने पाहणी केली होती. हे बांधकाम अनधिकृत असल्यामुळे बांधकामधारकांना स्व:खर्चाने बांधकाम काढण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यांनी बांधकाम न काढल्याने गुरुवारी नगररचना विभागाच्या आदेशाने अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Municipal employees breaking encroachment by JCB.
Wrestlers Protest : कुस्तीपटूंचा छळ करणाऱ्यास अटक करा; जिल्हा महिला असोसिएशनची मोहीम

सकाळी दहापासून ते सायंकाळी सातपर्यंत कारवाई

महापालिकेचे उपायुक्त गणेश चाटे, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख उमाकांत नष्टे, तसेच नगररचना विभागाचे अभियंता पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दहाला कारवाईस प्रारंभ झाला. सायकांळी सातपर्यंत ही कारवाई सुरू होती. जेसीबीच्या सहाय्याने हे अतिक्रमण काढण्यात आले.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

महापालिकेने पोलिसांचा बंदोबस्त मागविला होता. अतिक्रमण काढण्यास विरोधही झाला, तसेच अतिक्रमणविरोधी पथकासोबत वादही झाला. मात्र, पोलिसांनी तो वाद शांत केला.

Municipal employees breaking encroachment by JCB.
Amrut Yojana : अमृत टप्पा दोनच्या प्रकल्पासाठी 3 जागांचे भूसंपादन; आयुक्त डॉ. गायकवाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.