Jalgaon Crime: शाहुनगरात पैशांच्या वादातून 2 गटात घमासान; दंगलीचा गुन्हा दाखल

Sub-Divisional Police Officer Sandeep village with a contingent of Reserve Police Force while inspecting Shahunagar Chowk.
Sub-Divisional Police Officer Sandeep village with a contingent of Reserve Police Force while inspecting Shahunagar Chowk.esakal
Updated on

Jalgaon Crime : बांधकाम ठेकेदाराकडून घेतलेल्या रोख रकमेच्या वादातून शाहूनगरात दोन गटात वाद होवून दगडफेक झाल्याची घटना रविवारी (ता. २७) रात्री दहाच्या सुमारास घडली. भांडणातून झालेल्या दगडफेकीत चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

शहर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २८) सात जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (2 groups clash over money dispute in Shahunagar Riot case registered Jalgaon Crime)

चाळीसगावच्या यासीननगरातील परवेझ शेख सईद हे कुटूंबीयांसह आठ ते दहा महिन्यांपुर्वी पिंप्राळा, हुडको परिसरात राहायला आले होते.

त्यावेळी बांधकाम ठेकेदार इद्रीस शेख इकबाल यांच्याकडे मिस्तरी काम करीत असताना त्यांनी आगाऊ उचल म्हणून ४० हजार रुपये घेतले होते. त्यापैकी २५ हजार रुपये परत दिले. परंतू, सध्या ते चाळीसगाव येथे राहतात.

शाहूनगरात सासुरवाडी असल्याने ते पत्नी व मुलांना घेण्यासाठी आले होते. रविवारी रात्री ते ताज पान सेंटरजवळ राहणारे त्यांचे मामा शेख चाँद शेख सुपडू यांच्याकडे आले. त्यावेळी ठेकेदार इद्रीस शेख इक्बाल व इतरांनी राहिलेल्या पैशांवरून वाद घातला.

वादाचे पर्यावसन हाणामारीत होवुन दगडफेक करण्यात आली. यात, अस्लम शेख भिकन याच्या डोक्याला व हाताला, मुस्तकीम शेख मुक्तार याच्या नाकाला, फारुख शेख भिकन याच्या डोळ्याला, तर मुक्तार शेख सुपडू यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

जखमी परवेझ शेख यांच्या तक्रारीवरुन इद्रीस शेख इक्बाल (रा. पिंप्राळा हुडको), रहीम शेख अलाउद्दीन ऊर्फ रहिम पैलवान, फहीम शेख करीम, मोईन शेख करीम, आरिफ शेख करीम, इम्रान शेख करीम, सुलतान शेख फिरोज (रा. शाहुनगर) यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sub-Divisional Police Officer Sandeep village with a contingent of Reserve Police Force while inspecting Shahunagar Chowk.
Pune Crime : प्रेमाच्या त्रिकोणातून खून; पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

रहिवाशांना नेहमीचा त्रास

शाहुनगर भागात अंडा-पाव लॉरी, गांजा, दारु, सट्टा, पत्ता जुगाराची चलती आहे. परिसरात सर्वच हातावर पोट असणारे मजुर, कामगार वास्तव्यास आहेत.

शनिवारी पगार झाल्यानंतर तो शनिवार-रविवार जुगार, दारुत उधळून ऐन रविवारी किंवा सुटीच्याच दिवशी भांडणे होतात. शाहुनगर मार्केट येथे संध्याकाळनंतर दारुड्यांची जत्राच भरलेली असते.

चौका-चौकात रिकामटेकड्यांनी अड्डे तयार केले असुन, मध्यरात्रीनंतर पहाटे दोनपर्यंत गुन्हेगार, टार्गट तरुणांच्या मैफली रंगलेल्या असतात. किरकोळ वादातूनही दगडफेक आणि दंगल सदृष्य परिस्थती निर्माण होते.

दंगलीच्या अफवेने धावपळ

मध्यरात्री ताज पान सेंटरच्या गल्लीत दगडफेक झाल्याने दोन्ही गट समोरासमोर येवुन चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दगडफेकीचे वृत्त कळताच उपविभागीय पेालिस अधीकारी संदिप गावीत राखीव तुकडीसह घटनास्थळी दाखल झाले.

शाहुनगरात दंगल उसळल्याच्या अफवेने परिसरात एकच धावपळ उडाली. मात्र, पोलीसांनी वेळीच परिस्थीती हाताळून शांतता कायम केली. शहर पोलिस ठाण्यासह इतर पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला असून, रात्रीतून अटकसत्राला सुरवात करण्यात आली.

Sub-Divisional Police Officer Sandeep village with a contingent of Reserve Police Force while inspecting Shahunagar Chowk.
Solapur Crime : वास्तुशांतीला गेल्यावर घरफोडी; घरात प्रवेश करून बेडरूममधील...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.