Jalgaon News : शहरातील विशेषतः थकबाकीदार मालमत्ताधारकांकडे असलेली पालिकेची विविध करांची थकबाकी वसूल करण्यासाठी नगरपालिकेने कंबर कसली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, वसुलीसाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले असून, पथकाने शहरातील औद्योगिक वसाहतीसह इतर भागात फिरुन दोन थकबाकीधारकांच्या मालमत्तांना ‘सील’ ठोकले.
अशी कारवाई होऊ नये, यासाठी थकबाकीदारांनी करांचा तातडीने भरणा करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत ठोंबरे केले आहे. (properties in Chalisgaon sealed Tax collection campaign intensified in jalgaon city news)
शहरातील मालमत्ताधारकांकडे जवळपास सात कोटींहून अधिक थकबाकी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेला शंभर टक्के कर वसुलीचे लक्ष दिले आहे. त्यामुळे पालिकेने करांच्या वसुलीची मोहीम सध्या चांगलीच तीव्र केली आहे.
शुक्रवारी (ता. ९) दोन दुकानदारांकडून सहा लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली. महिन्यापासून पालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक राहुल साळुंखे, पथक प्रमुख दिनेश जाधव यांच्यासह भूषण लाटे, प्रेमसिंग राजपूत, सुमित सोनवणे व कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे.
पथकाने दोन मालमत्ता ‘सील’ केल्याने अशी कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी थकीत करांचा भरणा करावा, असे आवाहन पथक प्रमुख दिनेश जाधव यांनी केले आहे.
भुसावळला जप्तीची प्रक्रिया राबिवणार
भुसावळ : शहरात नुकतीच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आढावा बैठक घेऊन मालमत्ता करवसुलीबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच पालिकेच्या वसुली पथकाला वसुलीला गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यांनतर पथकाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. पालिकेला ४० कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट गाठायचे आहे. मात्र, पालिकेकडून अवघी २५ टक्केच वसुली झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत कर वसुलीला प्राधान्य द्यावे, अशा सूचना करीत पालिकेने वसुलीसाठी कर वसुली पथकांची संख्या वाढवावी, जेणेकरून करवसुली गतिमान होईल, असे सांगितले होते.
त्यानुसार पालिकेतर्फे कर वसुलीसाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहे, असे पालिकेचे उपमुख्याधिकारी लोकेश ढाके यांनी सांगितले. वसुलीचा दररोज आढावा घेतला जात आहे. भविष्यात जे थकबाकीदार कराची रक्कम भरत नाही, त्यांच्याकडे जप्तीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.