Jalgaon News : अट्टल घरफोड्याकडून 2 दुचाकी जप्त; कारागृहातून अटक करून गुन्हा उघड

Police team with seized material from arrested Ishtiaq Ali
Police team with seized material from arrested Ishtiaq Aliesakal
Updated on

जळगाव : एमआयडीसी (MIDC) पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार इश्तीयाक अली राजीक अली (वय २०, रा. तांबापुरा) याला अटक केली आहे. (2 two wheeler seized from house burglar arrested from jail crime revealed jalgaon news)

त्याच्याकडून दोन दुचाकीसह घरफोडी, असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांना त्याने दोन चोरीच्या दुचाकी काढून दिल्या. तांबापुरा येथे सादिन शब्बीर पटेल यांचे बंद घर फोडून ५० हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना गुरुवारी (ता. २ फेब्रुवारी) घडली होती.

घरफोडी इश्तीयाक याने केल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर त्याला दुसऱ्याच दिवशी निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे,

विकास सातदिवे, किशोर पाटील, इमरान सय्यद, सुधीर साळवे, सचिन पाटील, योगेश बारी, किरण पाटील, मुकेश पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी यांच्या पथकाने ताब्यात घेतले. तपासात त्याच्याकडून चोरीचे पन्नास हजार रुपये हस्तगत करण्यात येऊन त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Police team with seized material from arrested Ishtiaq Ali
Jalgaon News : मावशीची भेट घेऊन घरी जाण्यासाठी निघाला अन....

दोन वाहने जप्त

खेडी रोड परिसरातील दुचाकी इश्तीयाक यानेच चोरल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला कारागृहातून पुन्हा ताब्यात घेत दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात वर्ग केले. यादरम्यान चौकशीत त्याच्याकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

यातील एका दुचाकी चोरी प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांनतर इश्तीयाक अली याला गुरुवारी (ता. ९) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Police team with seized material from arrested Ishtiaq Ali
Jalgaon News : दिव्यांग मुख्याध्यापिका डायलिसिस वर; शासनाने वेतन थकविल्याने उपासमारीची वेळ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.