चाळीसगाव (जि. जळगाव) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक- स्टेशन रोड ते नागद रोड बाजार समिती पर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता.
अत्यंत रहदारीचा असलेल्या या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार असल्याने शहरवासीयांमधून आनंद व्यक्त होत आहे. (20 crore sanctioned for roads in Chalisgaon Success in pursuit of MLA Mangesh Chavan Jalgaon News)
या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत दुर्दशा झाली होती. नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण करावे, अशी मागणी होत होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकार सत्तेत आल्यानंतर तत्काळ सर्व आमदारांच्या शिफारशीनुसार ‘सीआरएफ’ अंतर्गत कामांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवले होते.
ज्यात आमदार मंगेश चव्हाण यांनी शहरातील या मुख्य रस्त्याच्या चौपदरी कॉक्रिटीकरण कामाचा प्रस्ताव दिलेला होता. त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या अवर सचिवांनी ३१ मार्चला पत्र काढून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक येथील मुख्य अभियंत्यांना देऊन यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
शहराच्या सौंदर्यात भर पडेल
या संदर्भात बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले, की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते घाट रोड हा शहरातील मुख्य रस्ता आहे. मात्र, तो खराब असल्याची जाणीव मला देखील होती. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हॉटेल दयानंद पर्यंतच्या रस्त्याचे काम आमदार निधीतून केले.
खरजई नाका ते हॉटेल दयानंद पर्यंतच्या रस्त्याचे काम नगरविकास निधीतून सुरू आहे. अतिशय रहदारीच्या असलेल्या या रस्त्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागावी, यासाठी कॉक्रिटीकरण करणेच गरजेचे होते.
त्यासाठी दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे आता लवकरच कामाला सुरुवात होईल. या कामासोबतच रस्त्याच्या दुभाजकांचेही सुशोभीकरण केले जाईल. ज्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.