Jalgaon Accident News : विचखेडा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर काम सुरू असून, या ठिकाणी डंपरने अचानक ब्रेक मारल्याने झालेल्या विचित्र अपघातात चार वाहने एकमेकांवर आदळून २० जण जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता. ५) दुपारी बाराच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळी गर्दी जमा होऊन जखमींना पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. विचखेडे गावानजीक सोमवारी (ता. ५) दुपारी जळगाव- नवसारी बस (क्रमांक एमएच ४०, एन ९८३०) ही पुढे चालणाऱ्या डंपरचालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागून धडकली. (20 people in 2 buses injured in freak accident near Vichkhede jalgaon news)
त्या मागे येणारी ४०७ मॅटेडोर (एमएच १५, एफव्ही ५९८३) ही बसवर धडकली. मॅटेडोरच्या मागून येणारी ठाणे भिवंडी बस (एमएच २०, बीएल १५४०) ही देखील मॅटेडोरवर धडकली. अशी चार वाहने एकमेकांवर धडकल्याने अपघात झाला.
यात खुशी राहुल पाटील (रिंगणगाव), मैनाबाई दिनकर निकम (बोळे), रेखाबाई दादाभाऊ महाले (मेहू टेहू), दुर्गेश्वरी दादाभाऊ महाले (मेहूटेहू), रावसाहेब ओंकार साळुंखे (वासखेळी, ता. साक्री), रमेश अभिमान पवार (रा. धुळे), उद्धव एकनाथ सोनवणे (मुल्लेर, सटाणा).
राकेश पुरुषोत्तम रणधीर (धुळे, मोहाडी), अर्चना राकेश रणधीर (धुळे, मोहाडी), दिनकर पिरण निकम (बोळे), आसिफ अहमद शेख (जळगाव), भावना बाळासाहेब सूर्यवंशी (टोळी, ता. एरंडोल), बेबाबाई पुंजू मराठे, पुंजू राजाराम मराठे.
ललिताबाई संदीप मराठे (तिघे रा. पारोळा), रेखाबाई रावसाहेब साळुंखे (वासखेळी, ता. साक्री) यासह इतर पाच ते सात जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना घटनास्थळावरून जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या रुग्णवाहिकेतून चालक आशुतोष शेलार, ऋषिकेश सूर्यवंशी यांनी पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले.
त्यांच्यावर डॉ. जिनेंद्र पाटील, डॉ. नईम बेग, परिचारिका निशा, पूजा कापसे आदींनी प्रथमोपचार केले. दरम्यान, महामार्गाच्या चुकीच्या कामांमुळे अपघाताची मालिका सुरू असल्याचा आरोप सरपंच भय्यासाहेब रोकडे यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.