Jalgaon ZP News : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांकात 20 टक्क्यांनी वाढ

 ZP school students
ZP school students sakal
Updated on

Jalgaon ZP News : जिल्हाधिकारी आयूष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद, महापालिकेच्या शिक्षण विभागाने १० दिवसांमध्ये इतर विषयांऐवजी फक्त गणिताच्या कौशल्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक कार्यक्रम विकसित केला.

त्याचा निकाल म्हणजे २० टक्के मुले गणितात पूर्वीपेक्षा चांगली तयार झाली आहेत. त्यांचा बुद्ध्यांक या उपक्रमातून वाढला असल्याचे दिसून आले. (20 percent increase in IQ of ZP school students jalgaon news)

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद निपुण भारत अभियान अंतर्गत ७ ऑक्टोबरला झालेल्या जिल्हा सुकाणू समिती सभेत जिल्ह्याचे शैक्षणिक स्वास्थ्य विश्लेषण पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या संकल्पनेतून, श्री. अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली ‘दहा दिवस गणितासाठी’ या उपक्रमाची अंमलबजावणी १० ते २० ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आली.

शिक्षण विभागाने समन्वयाने यशस्वीपणे त्यांची अंमलबजावणी करण्यात आली. उपक्रमादरम्यान जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, डायट व शिक्षण विभागातील अधिकारी यांनी शाळा भेटी करून सनियंत्रण व मार्गदर्शन केले.

शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला दिलेला प्रतिसादामुळे आणि राबविलेल्या कृती कार्यक्रमामुळे दहा दिवसात २० टक्केपर्यंत पायाभूत संपादणूकोत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. उपक्रमाच्या यशस्वितेबद्दल कौतुक होत आहे.

असा होता कार्यक्रम

- कालावधी : १० ते २१ ऑक्टोबर

- सहभागी शाळा : जिल्हा परिषद, महापालिका (१७११)

- इयत्ता १ ली ते ७ वी

- सहभागी विद्यार्थी संख्या : १ लाख ७४ हजार ४१२

- गणितीय पायाभूत क्षमता : गणन पूर्व तयारी, संख्याज्ञान, बेरीज, बजाबाकी, गुणाकार व भागाकार

- जिल्हा क्षमतानिहाय संपादणूक

क्षमता पूर्व स्थिती उत्तर स्थिती झालेली वाढ

गणन पूर्व तयारी ५७ ८० २३

संख्याज्ञान ६२ ८० १८

 ZP school students
Jalgaon ZP CEO News : ‘फाईल ट्रॅकिंग सिस्‍टीम’ नागरिकांसाठीही खुली करणार! : जि. प. सीईओ अंकित

बेरीज ५७ ७६ १९

वजाबाकी ५१ ६९ १८

गुणाकार ४५ ६४ १९

भागाकार ४२ ६३ २०

सरासरी ५२ ७२ २०

''निपुण भारत अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता वाढवायची आहे. या नियमित गणिताचे तास शाळेत घेतले जातील. आगामी काही महिन्यात विद्यार्थ्यांचा बद्ध्यांक ८० ते १०० टक्केपर्यंत जाईल यासाठी प्रयत्न आहे.''- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

 ZP school students
Jalgaon ZP News : जिल्हाधिकारी जेव्हा विद्यार्थी बनतात; जि.प.शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी साधला संवाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.