Jalgaon News : मेहरूण तलावातून काढली तब्बल 20 ट्रॉली जलपर्णी; स्वच्छतेसाठी लागणार अजून दोन दिवस

Officials of the municipality and the wildlife agency along with the water leaf removed
Officials of the municipality and the wildlife agency along with the water leaf removedesakal
Updated on

Jalgaon News : मेहरूण तलावाच्या काठावर तराफ्यांच्या सहाय्याने रविवारी (ता. १) व सोमवारी (ता. २) मिळून २० ट्रॉली जलपर्णी काढण्यात आली. पूर्ण जलपर्णी काढण्यासाठी आणखी २ दिवस लागतील.

सोमवारी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर मेहरून तलाव येथे तलाव स्वच्छता अभियान राबवित जलपर्णीचे निर्मूलन करण्यात आले. (20 trolleys of waterfowl were removed from Mehrun lake jalgaon news)

महापालिका आणि वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे आयुक्त विद्या गायकवाड यांच्या निर्देशानुसार शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सहाय्यक उपायुक्त उदय पाटील, संस्था अध्यक्ष रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

महापालिकेतर्फे रबर बोट, तराफे, मजूर, दोन ट्रॅक्टर लावण्यात आले आहेत. तलावाच्या काठावर असलेल्या जलपर्णी तराफ्यांच्या सहाय्याने, तर तलावात मध्यभागी असलेल्या जलपर्णीची रोपे रबरबोट वापरून काढण्यात आली.

दोन दिवसांत सुमारे २० ट्रॉली जलपर्णी काढण्यात आली. पूर्ण जलपर्णी काढण्यासाठी अजून २ दिवस लागतील, असा अंदाज संस्थेचे सचिव योगेश गालफाडे यांनी व्यक्त केला.तलावाच्या पूर्वेस असलेल्या मंगल पुरी वसाहतमधून येणारा मोठा नाला हा जलपर्णीचे मुख्य स्त्रोत आहे. त्यानंतर लेक सिटीकडून येणाऱ्या सांडपाण्यातदेखील ही वनस्पती फोफावली होती.

Officials of the municipality and the wildlife agency along with the water leaf removed
Jalgaon Boeing Aeroplane : जळगावहून ‘बोईंग’ सुरू होण्याचा मार्ग मोकळा; 'हा' रस्ता बंद करण्यास शेतकऱ्यांची संमती

कारण या भागात वसाहतीमधून येणारे सांडपाणी तलावात ठिकठिकाणी डबक्याच्या स्वरुपात थांबून असते. या दूषित पाण्यात ही वनस्पती प्रचंड प्रमाणात वाढली असल्याचे दिसून आले.

जलपर्णीचे निर्मूलन करण्यासाठी अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, प्रकाश चव्हाण, जगदीश साळुंखे, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, रवींद्र सोनवणे, निवांत इंगळे, निलेश ढाके, ऋषी राजपूत, मुकेश सोनार, सुरेंद्र नारखेडे, कृष्णा दुर्गे, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, रवींद्र भोई, पंकज सुर्यवंशी आदींनी सहकार्य केले.

"सांडपाणी मुख्यतः मानवी मलमूत्रामुळे तयार होते. मेहरूण तलावात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात आहे. यंदा वाढत असलेली जलपर्णी हे तलाव प्रदूषित होत असल्याचे संकेत देत आहे." -बाळकृष्ण देवरे, वन्यजीव संरक्षण संस्था

Officials of the municipality and the wildlife agency along with the water leaf removed
Jalgaon News : दूध फेडरेशन ते रेल्वे स्टेशन रस्ता धोकादायक; डांबरीकरण की कॉंक्रिटीकरण वादात रखडले काम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.