Road Construction Fund : रस्त्यासाठी 200 कोटीची घोषणा, मिळाले 14 कोटीच; शासनाच्या निधीची प्रतिक्षा

Funding News
Funding Newsesakal
Updated on

Road Construction Fund : शहरातील रस्त्याच्या कामांबाबत शासनाने दोनशे कोटी रूपयांच्या घोषणा केल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत केवळ १४ कोटी रूपयांचाच निधी देण्यात आला आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर आता निधी येणार कधी व रस्ते होणार कधी असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. (200 crore was announced for road only 14 crore was received from govt jalgaon news)

जळगाव शहरातील रस्त्यांची समस्या अत्यंत गंभीर आहे. ही समस्या थेट मुख्यमंत्र्यापर्यंतही पोचलेली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावच्या रस्त्यांसाठी शंभर कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. हा निधी खर्च झाल्यानंतर आणखी शंभर कोटी रूपये देण्याची घोषणाही त्यांनी केली होती.

त्यावेळी महापालिकेने ४९ रस्त्यांचा आराखडा करून पाठविला होता. त्यात केवळ ४२ कोटी रस्त्यांच्या कामासाठी मंजूर करण्यात आले होते. आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावच्या रस्त्यांसाठी शंभर कोटी रूपये देण्याची घोषणा केली आहे. या निधीतून जळगावचे सर्व रस्ते सिमेंट क्रॉंक्रीटचे करण्यात येणार आहेत. या निधीतून ५२ कोटी रूपयांच्या कामाच्या निवीदा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांचेही काम लवकरच सुरू होणार आहे.

केवळ १४ कोटीच प्राप्त

शासनाने शहरातील रस्ते कामासाठी निधी जाहिर केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहिर केलेल्या शंभर कोटींपैकी ४२ कोटींची कामे सुरू झाली आहेत. ४२ कोटी निधीतून शहरातील ४९ रस्त्यांची कामे होणार आहेत. त्यापैकी ३९ रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यातील काही बीएम, बीबीएम झालेली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Funding News
Jalgaon District Court : जिल्‍हा न्यायालयात गुरुवार-जन्मठेप, शुक्रवार-शनिवार सक्तमजुरी!

यात आतापर्यंत शासनाने केवळ १४ कोटी रूपयांचा निधी पाठविला आहे. निधी उपलब्ध करण्याबाबत शासनाला मक्तेदारातर्फेही पत्र देण्यात आले आहे. तसेच, महापालिकेनेही कळविले आहे. मात्र अद्याप शासनाकडून कोणताही निधी प्राप्त झालेला नाही. निधीअभावी या रस्त्याच्या कामांचाही प्रश्‍न निर्माण झालेला आहे. पावसाळ्यात डांबरीकरणाची कामे होणार तरी कशी, हा सुद्धा प्रश्‍न आहे?

कॉंक्रिटीकरणाचाही निधी नाही

शासनाने शहरातील रस्ते कॉंक्रिटीकरणासाठी तब्बल शंभर कोटीचा नवीन निधी जाहिर केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या निधीला मंजूरी दिली आहे. याचे कामही सार्वनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहे. तब्बल ५२ कोटी रूपयांच्या रस्त्यांच्या कामाच्या निवीदा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अद्याप एकाही रस्याचे काम सुरू झालेले नाही किंवा कोणताही निधीही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या निधीचीही आता प्रतिक्षा आहे.

"जळगावच्या रस्त्यांसाठी शासनाने निधीची घोषणा केली, ही अंत्यत चांगली बाब आहे. परंतु, प्रत्यक्षात निधी उपलब्ध करण्याबाबत कोणतेही नियोजन दिसत नाही. शासनाने निधी उपलब्ध करून घोषणेप्रमाणे रस्ते कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा." -सुनील महाजन, विरोधी पक्षनेता, महापालिका जळगाव

Funding News
Mansoon Fruit Precaution : पावसाळ्यात आजारांवर ‘फलाहार’ गुणकारी; या फळांचा करा आहारात समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.