Jalgaon Rain Update : जिल्ह्यात आतापर्यंत 22 टक्के पावसाची तुट; रावेर, मुक्ताईनगर, पारोळा तालुक्यांनी गाठली शंभरी

rain
rainesakal
Updated on

Jalgaon Rain Update : शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत एकुण सरासरीच्या ५९१.४ मिलीमिटर अर्थात्‌ ८५.३ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत २१.७६ टक्के पाउस आतापर्यंत कमी झाला आहे. असे असले, तरी रावेर, मुक्ताईनगर, पारोळा तालुक्यांनी पावसाची शंभर गाठली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात ११५.७ टक्के, रावेरला ११३.९, तर पारोळ्यात १००.८ टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंतच्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाई मिटल्यात जमा असून, यापुढे येणाऱ्या पावसामुळे पिकांसाठी व सिंचनासाठी चांगली सोय होणार आहे. (22 percent rainfall has decreased in district compared to last year jalgaon rain news)

यंदा जून महिन्यातील तब्बल पंचवीस दिवसांनी पाऊस झाला होता. यामुळे शेतकऱ्यांसह कृषी क्षेत्रावर संकट ओढावल्याचे चित्र होते. अलनिनोच्या प्रभावामुळे एप्रिलमध्ये पाऊस झाला, तेव्हा मॉन्सून लांबणार असे भाकीत करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनानेही ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल असे गृहीत धरून पाणी टंचाई आराखडा तयार केला होता.

जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैत दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या. ऑगस्टमध्ये मात्र पावसाने पूर्णत: ओढ दिल्याने पुन्हा खरिप हंगामावर दुष्काळाचे सावट होते. पाऊस पडण्यासाठी सर्वत्र सामूदायीक प्रार्थना झाल्या. त्यानंतर आता ८ सप्टेंबरपासून पाऊस पुन्हा चांगला सक्रीय झाला.

एवढा की, रावेर परिसरातील हतनूर धरणाच्या बॅक वॉटरमुळे, नदीच्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांची पीके पाण्याखाली आली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे पंचनाम्यांना वेग आला आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

rain
Jalgaon News : अडीच हजार हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीने नुकसान; कृषी विभागाचा अंदाज

पावसाच्या ओढीने खरिपातील तुर, मुग, उडीदाचे मोठे नुकसान झाले आहे. जिरायती कापसाला मात्र काही अंशी फायदा झाला आहे. संभाव्य नुकसान या महिन्यात पावसाने भरून काढले आहे. यामुळे कापूस उत्पादनात येणारी तुटही भरून निघण्याची चिन्हे आहेत, असे शेतकरी सांगतात.

तालुका मिलीमिटर टक्केवारी

जळगाव ४६५ ७३

भुसावळ ५१४.३ ९०.९

यावल ५५५.५ ९१.९

रावेर ६८५.५ ११३.९

मुक्ताईनगर ६१५.४ ११५.७

अमळनेर ४१२४.५ ७७.१

rain
Maharashtra Rain Update : येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात 'या' जिल्ह्यात मुसळधार; वाचा हवामान विभागाचा अंदाज

चोपडा ४२३.९ ६८.२

एरंडोल ५०२.३ ८८.२

पारोळा ८३.५ १००.८

चाळीसगाव ३५४.१ ६०.९

जामनेर ५६९.७ ८८.२

पाचोरा ५१७.६ ८६.३

भडगाव ४९१.५ ८२.०

धरणगाव ४१४.२ ६५.८

बोदवड ५४१.७ ८७.४

एकूण सरासरी ५०४ ८५.३.

rain
Rain Alert : उत्तर महाराष्ट्रात आजपासून तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.