भीती दूर करून २५० जणांचे वाचविले प्राण ;जिल्हा मानसिक आरोग्य विभागाचे यश

कोरोना लाटेनंतर अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. अनेकांना आपले आप्त गमावावे लागले. ते गमावल्यानंतर आता ‘नको हे जिणे’ असे सांगत अनेकांनी आत्महत्येचा विचार केला.
250 lives saved jalgaon Mental Health Department
250 lives saved jalgaon Mental Health Departmentsakal
Updated on

जळगाव : कोरोना महामारीने साऱ्या देशाला ग्रासले होते. अनेकांनी कोरोनाच्या भीतीपोटी, तर काहींनी आपले आता कसे होणार, या चिंतेनेच प्राण गमाविले. पहिल्या लाटेनंतर अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. अनेकांना आपले आप्त गमावावे लागले. ते गमावल्यानंतर आता ‘नको हे जिणे’ असे सांगत अनेकांच्या आत्महत्येचा विचार केला. या विचारापासून सुमारे २०० ते २५० रुग्णांना परावृत्त करून त्यांना आत्महत्या करण्यापासून वाचविण्यात जिल्हा मानसिक आरोग्य विभागाला यश आले आहे.

कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत कोरोना झालेल्यांचा तिरस्कार केला जात होता. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून तयार केल्यानंतर त्या भागात रुग्णवाहिकेचा आवाज जरी आला तरी सर्वांच्याच मनात धस्स होत होते. लोक, आता कोणाचा क्रमांक, असे विचारत होते. ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेल्यांना पहिल्या लाटेत आपले प्राण गमवावे लागले. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन लवकर न मिळाल्याने, तर तिसऱ्या लाटेत सहव्याधी असलेले व लस न घेतलेल्यांना प्राण गमवावे लागले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृताची संख्या अधिक होती. कोरोना हा भीतीचा आजार होता. जो घाबरला तो गेला अशी स्थिती होती. यामुळेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कोरोना झालेल्यांची मानसिक स्थिती चांगली राहावी, यासाठी सर्वच कोविड केअर सेंटरमध्ये मानसिक आरोग्य विभागाचे मानसोपचारतज्ज्ञ नेमून समुपदेशन करण्याचे आदेश दिले होते.

जिल्हा मानसिक आरोग्य विभागाच्या सात जणांच्या टीमने कोरोनाकाळात या रुग्णांना रोज मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचे धडे दिले. ज्या काळात सख्खा मुलगा कोरोनाबाधित झालेल्या आई- वडील, भावाकडे पाहायला तयार नव्हते त्या काळात या विभागाच्या टीमने कोरोनाबाधितांना वैयक्तिकरीत्या, सामूहिकरीत्या भेटून त्यांच्या मनातील भीती दूर केली. आत्महत्येचा विचार असणाऱ्यांना कोरोना हा बरा होणारा आजार आहे. जागतिक महामारी आहे. यामुळे न भीता धैर्याने तोंड द्या, नोकरी गेली तर दुसरी मिळेल, मात्र खचू नका. परिस्थितीवर मात करा, धैर्य ठेवा, चांगला विचार करा, अशी सकारात्मक विचारांची पेरणी करून नवीन स्वप्ने पाहा, आपली अपूर्ण स्वप्ने पूर्ण करायला नव्या जोमाने उभे राहा, असा मोलाचा सल्ला देऊन जगण्याची नवी उमेद दिली.

या टीमने केले समुपदेशन

मानसिक आजार कार्यक्रम अधिकारी डॉ. कांचन नारखेडे, मानसतज्ज्ञ तथा समुपदेशक डॉ. दौलत निमसे-पाटील, समुपदेश ज्योती पाटील, विनोद गडकर आदी.

ही होती आत्महत्येच्या विचारांची कारणे...

  • पती गेला, मी जीवनात राहून काय करू?

  • एकुलता मुलगा गेला, जीवनात आता काय करू?

  • नोकरी गेली, कुटुंबाचे पालनपोषण कसे करू?

  • आई-वडील गेले, जीवनाचे सारच गेले.

  • भविष्यांची चिंता वाटते.

  • कोरोना झाल्यानंतर समाज काय म्हणेल?

  • माझ्यावर अनेकांचे कर्ज ते कसे फेडू?

  • मला अमुक आजार आहे त्यात कोरोना झाला.

कोरोनाकाळात दोनशेच्यावर जणांना आत्महत्येपासून रोखले आहे. अजूनही अनेकांचे समुपदेशन सुरू आहे. सध्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहावी-बारावीचे विद्यार्थी, शेतकरी यांचे समुपदेशन सुरू आहे.

-डॉ. दौलत निमसे-पाटील, मानसतज्ज्ञ, समुपदेशक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.