Jalgaon News : महापालिका 86 कंत्राटी पदासाठी अडीच हजार अर्ज

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

Jalgaon News : महापालिकेतर्फे सहा महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणाऱ्या ८६ विविध पदासाठी आज (ता.२०) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २ हजार ५२१ अर्ज प्राप्त झाले.

महापालिकेतर्फे हंगामी कालावधीसाठी करार भरतीने करण्यात येणाऱ्या भरतीसाठी २८ सप्टेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ( 2500 applications for municipal corporation 86 contract posts jalgaon news)

यासाठी आस्थापना विभागात अर्ज दाखल करण्याची आजपर्यंत मुदत होती. आज शेवटच्या दिवशी एकूण २ हजार ५२१ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जाची छाननी करून महापालिकेतर्फे उमेदवारांची भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे.

शासन आदेशाशी संबंध नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कंत्राटी भरती रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या कंत्राटी भरतीबाबतही संभ्रम निर्माण झाला होता. मात्र त्या आदेशाशी या भरतीचा संबंध नसल्याचे सांगण्यात आले.

महापालिका आयुक्त आपल्या आधिपत्याखाली १९४९ चे कलम ५३ अनुसार सहा महिन्यासाठी कंत्राटी भरती करू शकतात. मात्र ही भरती कोणत्याही कंपनीतर्फे न करता महापालिका स्वतः करणार असून महापालिका महापालिका कंत्राटी नियुक्ती पत्रे देणार आहे.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : अखेर ‘चोसाका’कडील रक्कम शेतकऱ्यांना मिळणार; 3 कोटी 30 लाखांचे टप्पाटप्प्याने वाटप

भरतीची पदे व आलेले अर्ज

कनिष्ठ अभियंता बांधकाम (१०) : ३४१, कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा (३) : १००, कनिष्ठ अभियंता विद्युत (५) : ७९, रचना सहाय्यक (४) : १५३, आरेखक (२) : ३१, फायरमन (१५) : १७६, वायरमन (१२) : १६५, वीजतंत्री (६) : २६१, आरोग्य निरीक्षक (१०) : १८२, टंकलेखक, संगणक चालक (२०) : १०३३

''महापालिकेतर्फे ८६ पदासाठी हंगामी स्वरूपाची भरती ही महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून मेरिटवर शासकीय नियमाप्रमाणे करण्यात येणार आहे.''- डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Sand News : बांभोरी पुलाखालचे तळ पोखरले... आता रेल्वे पुलालगत वाळू तस्करी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.