Jalgaon Crime News : येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने गांधीधाम एक्स्प्रेसमधून २६ किलो गांजा जप्त केला आहे. अकोला ते भुसावळ दरम्यान ड्यूटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या शौचालयात दोन बेवारस गोण्या आढळून आल्या होत्या.
त्याची तपासणी केली असता त्यात २ लाख ६२ हजारांचा गांजा आढळून आला. ही कारवाई शुक्रवारी (ता. २७) आचेगाव रेल्वेस्थानकादरम्यान करण्यात आली. (26 kg ganja seized from Gandhidham Express jalgaon news)
रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी संजय पाटील आणि जितेंद्र इंगळे हे शुक्रवारी (त. २७) श्र्वानपथकासह गांधीधाम एक्स्प्रेस (२०८०३) मध्ये ड्यूटीवर असताना आचेगाव स्थानकावरून गाडी सुटताच श्र्वानाला (वीरू) उग्र वासामुळे कोच क्रमांक एस ९ च्या पुढच्या बाजूला वॉशरूममध्ये दोन बेवारस संशयास्पद गोण्या आढळून आल्या. ही माहिती विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्षामार्फत वरिष्ठांना कळवून या गोण्या भुसावळ फलाट क्रमांक चारवर उतरविण्यात येऊन सीसीटीव्हीच्या सर्व्हर रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या.
यावेळी निरीक्षक आर. के. मीना, उपनिरीक्षक के. आर. तरड, उपनिरीक्षक अनिलकुमार तिवारी, उपनिरीक्षक विनोद खरमाटे एसआयबी, बीएसएल, एएसआय वसंत महाजन, बीएसएल, एचसी विजय पाटील, एचसी योगेश पाटील आणि जीआरपी भुसावळचे एचसी धनराज लुले या ट्रेनच्या कोचमध्ये उपस्थित होते.
या दोन्ही गोण्या नायब तहसीलदार, उपनिरीक्षक तसेच छायाचित्रकार यांच्या समक्ष उघडल्या असता त्यात १३ बंडल २६ किलो गांजा आढळून आला.
गोण्यांमध्ये १३ बंडल
गोण्यामधील १३ बंडल उघडले असता त्यामधून आंबट उग्रवास आणि त्यात बिया असलेला ओला गांजा दिसला. सदरील गांजाचे वजन २६.२५८ किलो असल्याचे आढळून आले. ज्याची अंदाजे एकूण किंमत २ लाख ६२ हजार ५८० रुपये एवढी आहे. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त एच. श्रीनिवास राव, सहायक सुरक्षा आयुक्त (भुसावळ) अशोककुमार, आरपीएफ निरीक्षक राधा किशन मीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के. आर. तरड यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.