Summer Vacation : उन्हाळी सुट्यांमध्ये धावणार साप्ताहिक 26 विशेष रेल्वेगाड्या

special railway
special railwayesakal
Updated on

भुसावळ (जि. जळगाव) : प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कानपूर दरम्यान २६ साप्ताहिक विशेष गाड्या आणि

पुणे ते विरांगणा लक्ष्मीबाई जंक्शन दरम्यान २६ साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या (Railway) चालविण्यात येणार आहे. (26 special trains will run weekly during summer vacation jalgaon news)

लोकमान्य टिळक टर्मिनस - कानपूर सुपरफास्ट स्पेशल (२६ फेऱ्या) स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ८ एप्रिलपासून ते १ जुलैपर्यंत (१३ फेऱ्या) दर शनिवारी सव्वातीनला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ३.२५ ला कानपूर सेंट्रलला पोहोचेल.

स्पेशल कानपूर सेंट्रल येथून ७ एप्रिलपासून ३० जूनपर्यंत (१३ फेऱ्या) दर शुक्रवारी ३.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २.५५ ला पोहोचेल. भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज आणि फतेहपूर याठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

special railway
BHR Case : बीएचआर अवसायकाच्या नियुक्तीचे त्रांगडे मिटेना

पुणे - विरांगणा लक्ष्मीबाई जंक्शन स्पेशल ट्रेन (२६ फेऱ्या) पुणे येथून ६ एप्रिलपासून २९ जूनपर्यंत (१३ फेऱ्या) दर गुरुवारी ३.१५ वाजता सुटेल आणि विरांगणा लक्ष्मीबाई जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी ९.३५ वाजता पोहोचेल.

स्पेशल विरांगणा लक्ष्मीबाई जंक्शन येथून ५ एप्रिलपासून ते २८.०३.२३ (१३ फेऱ्या) पर्यंत दर बुधवारी १२.५० ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.३५ ला पुणे येथे पोहोचेल. दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नर्मदापूरम, भोपाळ, विदिशा, बीना आणि ललितपूर असे थांबे आहेत.

special railway
Shivsena : मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केवळ ‘गाजर’ दाखविले; शिवसेना ठाकरे गट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()