Jalgaon Crime News : नशिराबाद येथून जाणाऱ्या वाहनांमधून जनावरांची चोरटी वाहतूक होत असल्याच्या निनावी दूरध्वनीवरून पोलिसांनी नाकाबंदी करून तीन संशयास्पद वाहनांची तपासणी केली.
या वाहनांमध्ये ५३ म्हशी आढळून आल्या. या प्रकरणी एकूण ३६ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल व तीन वाहनचालकांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे. (3 animal vehicle seized in Nashirabad jalgaon crime news)
नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार हशरत अली सय्यद अलीसह कर्मचारी शुक्रवारी (ता. २९) रात्री गस्त करीत असताना नशिराबाद टोल प्लाझावरून डायल ११२ वरून जनावरांची चोरटी वाहतूक होत असल्याबाबत फोन आला.
त्या अनुषंगाने नाकाबंदी लावून वाहने तपासणी करीत असताना संबंधित वाहनचालकांना जनावरे वाहतूक करण्याचा परवाना मागणी केली असता, चालकांनी परवाना नसल्याचे सांगितले. या तिन्ही चालकांनी वाहनांमध्ये म्हशींना निर्दयतेने दाटीवाटीने कमी जागेत भरून अवैध वाहतूक करून नेतानामिळून आले.
या प्रकरणी आयशर ट्रक (एमएच १८, बीजी ९३१६) चालक सायब खान कलीम खान (वय २८, रा. बळखड, जि. खरगोन), ट्रक (एमएच १८, बीझेड २४४४) चालक साहीद खान सलीम खान (वय ३५, रा. बाल समट, जिल्हा, खरगोन), ट्रक (एमपी १३, जीबी ३६५४) चालक समीर शहा सिद्धीक शहा (वय २९, रा. देवास इंदूर) यांना ताब्यात घेण्यात आले असून, विचारपूस केली असता, खरगोन व देवास येथून जनावरे विक्रीसाठी जळगावच्या बाजारात घेऊन जात असल्याचे सांगितले. पोलिस कर्मचारी अतुल लक्ष्मण महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.