Jalgaon Crime News : चाळीसगावात चोरट्यांची ‘दिवाळी’

Burglary
Burglaryesakal
Updated on

चाळीसगाव (जि. जळगाव) : घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी वरच्या मजल्यावरील बेडरुममधील कपाटातून पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शहरातील पोस्टल कॉलनीत उघडकीला आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (3 lakh cash with gold ornaments stolen from lawyer house jalgaon crime news)

Burglary
Nashik Crime News : दोडी परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ!

शहरातील पोस्टल कॉलनीतील मनोज पितांबर चौधरी (वय ४२) हे कुटुंबासह वास्तव्याला असून, वकील म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी वरील मजल्यावरील बेडरुममधील कपाटातून ३० हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे झुमके, १ लाख रुपये किमतीच्या २० ग्रॅमच्या दोन सोन्याच्या बांगड्या, १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या २५ ग्रॅम वजनाच्या सोन्याचे ब्रेसस्लेट, ३० हजाराची ५ ग्रॅम वजनाची बदामी आकाराची सोन्याची अंगठी, असे एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

ही घटना गुरुवारी (ता.२७) दुपारी साडेचार ते रविवारी (ता.३०) दुपारी सव्वाचारच्या दरम्यान घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी मनोज पितांबर चौधरी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल टकले हे करीत आहे.

शहरासह ग्रामीण भाग ‘लक्ष्य’

चाळीसगाव शहरासह ग्रामीण भाग चोरट्यांनी लक्ष्य केला असून, वाघळी येथे दोन दिवसांपूर्वी पत्र्याच्या दुकानात मागून शिरकाव करून चोरट्यांनी ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दुसऱ्या एका घटनेत खेडी खुर्द (ता. चाळीसगाव) येथील निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याच्या घरातून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह आठ लाख २० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. एकापाठोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे चोरट्यांची हिंमत वाढली असून, पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Burglary
Police Bharati : वर्षामागून वर्षे निघून चालली, संधी केव्हा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()