Jalgaon Crime: भुसावळला 3 वाळूची वाहने ताब्यात; वाळूमाफियांविरोधात ‘महसूल’ची धडक कारवाई

3 sand vehicle seized at Bhusawal jalgaon crime news
3 sand vehicle seized at Bhusawal jalgaon crime newsesakal
Updated on

Jalgaon Crime : तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून वाळूमाफियांचा धुमाकूळ सुरू आहे. वाळू वाहनांच्या पाठीमागे वाळूमाफियांचे वाहन भरधाव वेगाने कुठल्याही अधिकाऱ्यांची भीती न बाळगता बिनधास्तपणे सुसाट धावत आहे.

एकीकडे जिल्ह्याधिकारी आयुष प्रसाद यांनी वाळूमाफियांविरुद्ध कंबर कसली आहे. या पाश्वर्भूमीवर उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नीता लबडे यांनी पथक तयार करून वाळूची तीन वाहने जप्त केली आहेत. (3 sand vehicle seized at Bhusawal jalgaon crime news)

याबाबत ३० व ३१ ऑक्टोबरला महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी तलाठी व कोतवाल पथकांनी अजित श्रीराम खातोड यांच्या मालकीचे वाहन (एमएच १९, झेड ३६३६)पिवळ्या रंगाचे डंपर जळगावकडून मुक्ताईनगरकडे जात असताना भुसावळ येथील वांजोळा रोड रेल्वे ब्रिजजवळ अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंध कामी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तलाठी व कोतवाल यांचे संयुक्तिक पथक गस्तीवर असताना वाहन तपासणी घेतले असता वाहन चालकाकडे ईटीपी गुजरात राज्याची पावती होती.

परंतु दोन्ही पावत्यांमध्ये तफावत आढळून आल्याने हे वाहन व्हेईकल ट्रेकिंग करण्याकामी तहसील आवारात नेत असताना पीकअप गाडी ही त्याच दिशेने भुसावळकडे येत असताना त्या वाहनाची तपासणी केली. त्यात देखील अवैध वाळू आढळून आली. या वाहनाचा क्रमांक एमएच २०, ईएल ०२७१ असा होता.

3 sand vehicle seized at Bhusawal jalgaon crime news
Jalgaon Crime : नशेत तर्रर्र.. बेवड्याच्या कंबरेला लोडेड पिस्तूल; शिवाजीनगरातून एक अटकेत

महसूल पथकाला पाहताच वाहन थांबवून वाहन चालक जागेवरून पसार झाला. गस्तीवर असलेल्या पथकातील कर्मचार्यांच्या मदतीने हे वाहन तहसील कार्यालयात जमा केले असून, दोन्ही वाहनाचा पंचनामा केलेला आहे.

तसेच ३१ ऑक्टोबरला जळगावकडून भुसावळकडे येणारे डंपर (एमएच १५, बीजी ५२१४) दीपक कौतिक तायडे (रा. निमखेडी) यांच्या मालकीचे अवैधरित्या वाळू वाहतूक करताना जप्त केल्याने या वाहनाचा व वाहनातील गौण खनिजाचा पंचनामा केलेला असून, वाहन तहसील कार्यालयात दंडात्मक कार्यवाही करता जमा केले आहे.

ही कारवाई रजनी तायडे (मंडळ अधिकारी, वरणगाव), एफ. एस. खान (मंडळ अधिकारी, पिंपळगाव), प्रफुल्ल कांबळे (मंडळ अधिकारी), प्रवीण पाटील (मंडळ अधिकारी कुऱ्हे), मिलिंद तायडे तलाठी, साकेगाव मंगेश परीसे तलाठी, वरणगाव नितीन केले तलाठी वराडसीम, जितेश चौधरी कोतवाल साकेगाव, शरद पवार कोतवाल यांनी केली.

3 sand vehicle seized at Bhusawal jalgaon crime news
Jalgaon Fraud Crime: अकाली विधवा झालेल्या तरुणीशी मैत्री करून फसवणूक; इन्स्टाग्रामवर मजुराचा झाला डॉक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.