Jalgaon News : सर्वच क्षेत्रातील आव्हाने, कुटुंबातील वाद आणि त्यातून निर्माण झालेल्या नैराश्यातून आत्महत्या करण्याचे प्रकार, प्रमाण कमालीचे वाढले असून अशा स्थितीत समाजात जगणं झालं महाग...अन् मरण स्वस्त’ असे म्हणायची वेळ आली आहे.
आणि हेच शहर व जिल्ह्यात झालेल्या तीन आत्महत्येच्या घटनावरुन स्पष्ट होत आहे. (3 suicides in city district jalgaon news)
तणावात असलेल्या अल्पवयीन तरुणीने घरात लहान भावाला दुकानावर पाठवून गळफास घेऊन आत्महत्या केली. ट्विंकल ऊर्फ पूजा सुरेश चौधरी (वय १७, रा. विठ्ठलपेठ) असे मृत तरुणीचे नाव आहे. शुक्रवारी (ता.१३) दुपारी ही घटना उघडकीस आली. पूजा विठ्ठलपेठेत तिच्या आई-वडील व लहान भावासोबत राहत होती.
शुक्रवारी सकाळी शिरपूर येथे तर वडील शेतात गेले होते. दुपारी ती लहान भाऊ दीपकसोबत घरीच होती. दुपारी अडीचला तिने दीपकला दुकानावर काही वस्तू घेण्यासाठी पाठवीत राहत्या घरात गळफास घेतला. दीपक घरी आला त्या वेळी त्याला बहिणीने गळफास घेतल्याचे दिसले. त्यानंतर ट्विंकल हिस शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासून तिला मृत घोषित केले.
दुसरी घटना शिरसोलीत घडली. येथील तरुणाने नैराश्यात येऊन रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. महेंद्र कृष्णा पाटील (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे.
शुक्रवारी (ता.१३) दुपारी ही घटना घडली. महेंद्र पाटील हा अविवाहित होता. त्याच्या वडिलांचे कोरोना काळात निधन झाले होते. तो आईसोबत राहत होता.
शेतात मजुरी करून तो उदरनिर्वाह करायचा. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो तणावात असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दुपारी गावाजवळच्या रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह आढळून आला.एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तिसरी घटना जळगाव तालुक्यातील भोकर गावाच्या शिवारात घडली. घरात सर्व जण झोपलेले असताना शेतमजुराने शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. बहादूर रेमसिंग बारेला (५३, मूळ रा. पलासूद, जि. बडवाणी, मध्यप्रदेश, ह.मु. भोकर, ता. जळगाव) असे मृताचे नाव आहे. मध्यप्रदेशातून रोजगारासाठी आलेले बहादूर बारेला हे भोकर येथे पत्नी, मुलगा, मुलीसह राहत होते. गुरुवारी (ता.१२) रात्री सर्व जण घरात झोपलेले असताना बारेला यांनी जवळील शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.