जळगाव : अवघ्या 12 तासात चोरट्यांनी लंपास केल्या 3 दुचाकी

चोरट्यांनी एक दुचाकी पोलिस अधीक्षक निवास्थानाशेजारुन चोरली आहे.
vehicle theft
vehicle theftsakal
Updated on

जळगाव : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत श्रध्दा कॉलनी, समतानगर आणि काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानाच्या पार्किंगमधून अशा तिन वेगवेळ्या ठिकाणाहून अवघ्या बारा तासात तीन मोटारसायकली चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. (Latest Marathi News)

vehicle theft
जळगाव : मन्यारखेड्यात घरफोडी 64 हजारांची रोकड लंपास

शहरातील श्रद्धाकॉलनी, ओंकार अपार्टमेंटमध्ये विलास होले (वय ५८) यांच्या घरासमोर उभी दुचाकी (एमएच १९ सीसी ५८४०) गुरूवारी (ता. ७) मध्यरात्री चोरीला गेली. त्यानंतर समतानगर, शिव मंदिराजवळ वास्तव्यास असलेले राजेश सैंदाणे (वय २६) यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १९. डीएम ७०२१) आदल्या बुधवारी (ता. ६) चोरट्यांनी चोरुन नेली होती. तर, तिसऱ्या गुन्ह्यात अयोध्यानगरातील रहिवासी श्रीकांत कासार (वय ५१) यांची दुचाकी (एमएच १९ सीटी ६२०४) चोरट्यांनी गुरुवारी (ता. ७) संध्याकाळी साडेसात वाजता काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानाच्या पार्किंगमधून चोरुन नेली. रामानंदनगर पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल असून तपास पोलिस नाईक विजय खैरे, प्रवीण जगदाळे, संजय सपकाळे करीत आहे.

vehicle theft
लोकसंख्या वाढीत भारत लवकरच अव्वलस्थानी! चीनला टाकणार मागे - UN Report

गस्तीवर प्रश्न

रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या बारा तासांत तीन मोटारसायकली चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. त्यापैकी एक पोलिस अधीक्षक निवास्थानाशेजारील भाऊंच्या उद्यानाजवळून चोरीला गेली तर इतर दोघेही तक्रारदारांच्या घरासमोरुन मध्यरात्री लंपास झाल्या आहेत. पोलिस ठाणे हद्दीतील गस्त आणि नाईट पेट्रोलिंगबाबत आता प्रश्न उपस्थीत होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()