Jalgaon Accident News: कंटेनरची ‘पिक-अप’ला धडक; विचखेड्याजवळ अपघातात 3 महिला ठार

3 women were killed in Container pickup accident in Vichkhede jalgaon news
3 women were killed in Container pickup accident in Vichkhede jalgaon news
Updated on

Jalgaon Accident News : चिलाणे (ता. शिंदखेडा) येथे अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या पिक-अप वाहनाला कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारासाठी धुळे येथे नेत असताना एकाची प्राणज्योत मालवली.

इतर २१ जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. १) दुपारी बाराच्या सुमारास विचखेडे (ता. पारोळा) गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर बायपास रस्त्यावर घडली. (3 women were killed in Container pickup accident in Vichkhede jalgaon news)

बोळे (ता. पारोळा) येथून चिलाणे (ता. शिंदखेडा) येथे अंत्यसंस्कारासाठी प्रवासी वाहतूक करणारे पिक-अप वाहन (एमएच १८, एम ५५५४) निघाले होते. या वाहनात २४ महिला व पुरुष होते. दरम्यान, शुक्रवारी (ता. १) दुपारी बाराच्या सुमारास लोखंडी रोल असलेला एक कंटेनर (जीजे १२, बीडब्ल्यू ७२५४) चा ताबा सुटल्याने कंटेनरने पिक-अप वाहनाला जोरदार धडक दिली. यात रेखाबाई गणेश कोळी (वय ५५), योगिता रवींद्र पाटील (वय ४०, रा. बोळे, चंदनबाई नानाभाऊ गिरासे (वय ६५) या मृत झाल्या, तर इतर २१ जण जखमी झाले आहेत.

यात भरत गिरासे, रणजित गिरासे, राजेश कोळी, भीमकोर गिरासे, भुराबाई गिरासे, चंदनबाई गिरासे, रेखाबाई गिरासे, नाना गिरासे, भटा गिरासे, सुनीता गिरासे, धुराबाई गिरासे, रेखाबाई कोळी, अजतसिंग गिरासे, सय्यद लिहायत, हिराबाई गिरासे, भीमकोरबाई गिरासे, भगवान गिरासे, रणजितसिंग गिरासे, रुपासिंग गिरासे, दश्याबाई गिरासे व राजेबाई कोळी, असे एकूण २१ जण गंभीर जखमी झाले. इतरांवर प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

3 women were killed in Container pickup accident in Vichkhede jalgaon news
Jalgaon Accident News : मेहुणबारेजवळ लक्झरी बस उलटली; प्रवासी चालकाच्या वादामुळे घडलेली घटना

कुटीर रुग्णालयास यात्रेचे स्वरूप

अपघाताचे वृत्त कळताच बोळे परिसरातून शेकडो नागरिकांनी अपघातस्थळी, तसेच कुटीर रुग्णालय परिसरात एकच गर्दी केल्याने यात्रेचे स्वरूप आले होते. या वेळी माजी आमदार डॉ. सतीश पाटील, बोळे येथील माजी सरपंच रावसाहेब गिरासे यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या वेळी घटनेची माहिती कळताच बाजार समिती उपसभापती सुधाकर पाटील यांनी त्यांच्या खासगी वाहनाने जखमींना उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल केले. या वेळी माजी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील यांच्यासह अनेकांनी मदत केली.

...यांनी केले जखमींवर उपचार

जखमींवर डॉ. अमोल भोसले, डॉ. राजेश वाल्डे, कांताई हॉस्पिटलचे संचालक डॉ. नीलेश पाटील यांनी उपचार केले. परिचारिका प्रतिभा सोनवणे, कल्पना चौधरी, ब्रदर पंकज पाटील, राखी बडगुजर, करुणा पवार, रुग्णवाहिकाचालक ईश्वर ठाकूर, तुषार शेलार, आशुतोष शेलार, जयदेव चौधरी, दीपक सोनार, प्रेम वानखेडे, सागर मराठे, प्रसाद राजहंस यांनी जखमींवर औषधोपचारासाठी सहकार्य केले.

3 women were killed in Container pickup accident in Vichkhede jalgaon news
Jalgaon Accident News : धरणगावजवळ आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.