Jalgaon News : शहरातील चाळीसगाव रोडवरील साई ऑटो सेंटर (बजाज शोरूम) येथून बजाज कंपनीच्या ३० मोटारसायकली चोरट्यांनी लंपास केल्या. यामध्ये १६ प्लॅटिना व १४ पल्सर गाड्या चोरीला गेल्या.
ही घटना शोरुममधील स्टॉक रजिस्टर तपासल्यानंतर उघडकीस आली असून, एकूण २३ लाख रुपये किमतीच्या मोटारसायकल चोरी झालेल्या आहेत. या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (30 new motorcycle theft by thieves Sai Auto Center in Bhadgaon Jalgaon Crime News)
शहरातील चाळीसगाव रोडवरील साई ऑटो सेंटरचे संचालक रावसाहेब पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की नेहमीप्रमाणे सकाळी दहाला साई ऑटो शोरूमला जाऊन कामावर देखरेख तसेच दुचाकी वाहनांच्या विक्रीबाबत तपशिलाची माहिती घेतली जाते.
दरम्यान, रविवारी (ता. ११) दुपारी तीननंतर शोरूमचे व्यवस्थापक महेश लोटन पाटील यांनी शोरुममधील दुचाकी वाहनांच्या स्टॉकची पडताळणी केली.
पडताळणीदरम्यान काही दुचाकी कमी आढळून आल्या. स्टॉक एन्ट्री व सेल झालेल्या दुचाकी वाहनांबाबत अधिकची पडताळणी केली असता या स्टॉकमध्ये ३० दुचाकी कमी आढळून आल्या.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यानंतर खात्री केली असता शोरुममधील बजाज कंपनीच्या ३० दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आले. यात बजाज कंपनीच्या १६ प्लॅटिना व १४ पल्सर अशा २२ लाख ७७ हजार ९८० रुपये किमतीच्या विना पासिंगच्या ३० दुचाकी साई ऑटो शोरुममधून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी वेळोवेळी काढून लंपास केल्याचे उघडकीस आले.
याबाबत भडगाव पोलिस ठाण्यात रावसाहेब पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस कर्मचारी नितीन रावते करीत करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.