Jalgaon News: रस्ते-पुलांच्या बांधणीसाठी 300 कोटींचा निधी; जामनेर तालुक्यासह जिल्ह्यात होणार विकासकामे

Funding
Fundingesakal
Updated on

Jalgaon News : तालुक्यातील बहुतांश गावांना आणि जिल्ह्यातील काही ठिकाणी जोडण्यात येणाऱ्या रस्ते - पूल- जलनिसःरण बांधकामासाठी नाबार्ड, आशियाई विकास बँक आणि राज्यमार्ग विभागाकडून पुरवणी अर्थसंकल्पाद्वारे तब्बल ३०० कोटी ९४ लाखांवर निधीला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास-पंचायतराज तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयातून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली. (300 crore fund for construction of roads and bridges jalgaon news)

या मध्ये कठोरे दिगर- सटाणा- मालेगाव- चाळीसगाव - पाचोरा- शेंदुर्णी -पहूर या मार्गासाठी २८४ (आशियाई विकास बँक) सुमारे १८३ किलोमीटर लांबी, खांडवा ते भारूडखेडा, हिवरी दिगर ते राज्यमार्ग पुलाचे बांधकाम, राज्य सिमा बिटवा ते भुसावळ-जामनेर फत्तेपूर, मोताळा-तरवाडी फाटा ते पिंपळगावराजा ते खामगाव-गारखेडा (ता. जामनेर), सावखेडा फाटा, एरंडोल- म्हसावद-नेरी केकतनिंभोरा, जामनेर शहरातील दुभाजक दुरुस्तीसह बांधकाम, जामनेर ते पळासखेडा दरम्यान रस्त्यांचे काँक्रिटीकरण.

Funding
Jalgaon News: पाडळसे प्रकल्पासाठी 5 हजार कोटींची ‘सुप्रमा’; ‘पंतप्रधान कृषी सिंचन योजने’त समावेशाचा मार्ग मोकळा

फत्तेपूर- गोद्री ते जिल्हा हद्द, तोंडापूर जलनिस्सारण बांधकाम, गारखेडे-मुंदखेडा, मांडवे बुद्रुक ते चिंचखेडा तवा ते कुंभारी, अंबिलहोळ देवीचे ते गारखेडा बुद्रुक, मांडवे बुद्रुक ते चिंचखेडातवा, शहापूर ते टाकरखेडा रस्ता-पूल बांधकाम, पहूर पळासखेडा रस्त्यावर वाघूर नदीवर, वाघारी ते शेलवड रस्त्यावर सूर नदीवर एक आणि दोन नाल्यांवर (एकूण तीन) पूल बांधणे, मेहेगाव-लोणी रस्त्यावर कांग नदीवर, देवपिंप्री पळासखेडा- रस्त्यावर वाघूर नदीवर.

सावरला-तळेगाव रस्त्यावर कांग नदीवर पूल रस्ता, वाकडी गोराडखेडा- रस्त्यावरील नाल्यावर रस्ता, पूल बांधकाम, सोयगाव- शेंदुर्णी रस्त्यापासून मेणगावला जोडणाऱ्या रस्त्यावर सोन नदीवरील पूल, रस्ता, खर्चाणे ते एकुलती रस्त्यावर वाघूर नदीवर पूल, जामनेर लहासर रस्त्यावर कांग नदीवर एक आणि नाल्यावर एक (एकूण दोन) पूल बांधणे, टाकळी मोयगाव रस्त्यावर वाकी नदीवर पूल, कोदोली-भागदरा रस्त्यावरील नाल्यावर रस्ता पूल बांधणी आदी गावांच्या कामांचा समावेश आहे.

Funding
Jalgaon News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा; चाळीसगाव तालुक्यात केंद्रीय पथकाची पाहणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.