MSTC Jalgaon News : Smart Card साठी 31 मार्चची Deadline

ST Smart Card
ST Smart Cardesakal
Updated on

वावडे (ता. अमळनेर) : पंच्चाहत्तर वर्षावरील ज्येष्ठ‎ नागरिक विविध योजनांतील‎ लाभार्थ्यांना मोफत तसेच ६०‎ वर्षावरील नागरिकांसह रुग्णांना‎ बसेसच्या प्रवास भाड्यात सवलत‎ मिळण्यासाठी स्मार्ट कार्ड आवश्यक‎ आहे.

मात्र, कार्ड काढण्यासाठी‎ तांत्रिक अडचणी येत असल्याने‎ शासनाकडून स्मार्टकार्ड‎ काढण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची‎ योजनांतील देण्यात आली आहे.‎ त्यामुळे ज्यांना एसटी महामंडळाच्या‎ बसचा मोफत प्रवास सवलतीचा‎ प्रवास करण्याची मुभा आहे,‎ त्यांच्याकडे दोन महिन्याचा अवधी‎ असल्याचे समोर आले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ (31st March deadline for Smart Card State Transport Corporation Order Registration required for beneficiaries Jalgaon News)

ST Smart Card
Nashik News : ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर कारवाई; एमजी रोडवर अर्ध्यावर अनधिकृत पार्किंग

राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक, तसेच विविध‎ सामाजिक घटकांना प्रवास प्रवास‎ भाड्यात सवलत देण्यासाठी शासनाने‎ एक जून २०१९ पासून स्मार्टकार्ड‎ योजना कार्यान्वित करण्यात आली‎ आहे.

या योजनेतून ज्येष्ठ नागरिक,‎ विविध सामाजिक पुरस्कार प्राप्त‎ व्यक्ती, विद्यार्थी तसेच रुग्णांना स्मार्ट‎कार्ड देण्यात येत आहेत. त्यासाठी‎ त्याची अगोदर नोंदणी करून घेण्यात‎ येत आहेत. महामंडळाने गैरप्रकाराला‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आळा घालण्यासाठी या स्मार्टकार्ड‎ योजना सुरू केली आहे. त्यानुसार‎ प्रवाशांनी या योजनेचा लाभ घ्यावा,‎ अशी अपेक्षा आहे.‎

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

ST Smart Card
Nashik News: आयुक्त म्हणतात, भिऊ नका मी तुमच्या पाठीशी! विभागप्रमुखांना वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याच्या सूचना

२९ घटकांना लाभ

महामंडळाच्या‎ बसेसमध्ये जिल्ह्यातील २९ प्रकारच्या‎ समाजघटकांना बसेस शंभर टक्के‎ तसेच २५, ५० आणि ७५ टक्के‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सवलत देण्यात येते. यात‎ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ‎ साठे, संत गाडगेबाब व्यसनमुक्ती‎ पुरस्कार आणि अन्य पुरस्कार प्राप्त‎ व्यक्तींना व पत्रकार, लोकसभा‎, विधानसभा प्रतिनिधींना मोफत‎ प्रवास सुविधा आहे.‎‎

रिजार्च होत नसल्याची अडचण‎ विविध योजनेतून देण्यात येणाऱ्या सवलतीतून‎ अनेकांना स्मार्ट कार्डाचे वितरण करण्यात आले‎ आहेत. त्याचे नूतनीकरणही करण्यात आले‎ आहेत. मात्र, त्याचे रिचार्ज करण्यात तांत्रिक अडचण‎ निर्माण झाली. तसेच सर्व्हरची अडचण भेडसावत‎ असल्याने सध्या कार्ड वितरण बंद आहेत. ते लवकरात‎ लवकर सुरू व्हावेत, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.‎

आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ

शासनाकडून‎ आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पुन्हा ३१ मार्चपर्यंतची डेडलाइन दिली आहे. या काळात सर्वच लाभार्थीनी नोंदणी करून घेणे‎ आवश्यक आहे. त्यानंतर लाभार्थ्यांना मोफत बस प्रवास‎ करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी‎ स्मार्ट कार्ड काढून घेणे आवश्यक आहे.

ST Smart Card
New Rules Before Budget : बजेटपूर्वीच देशात 'या' नियमांमध्ये बदल; LPG किमतीबाबत मोठी अपडेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.