Jalgaon News : धरणगाव लोकन्यायालयात 37 प्रकरणे तडजोडीने निकाली

37 cases were settled by compromise in Dharangaon People Court jalgaon news
37 cases were settled by compromise in Dharangaon People Court jalgaon news esakal
Updated on

Jalgaon News : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात तालुका वकील संघ व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. (37 cases were settled by compromise in Dharangaon People Court jalgaon news)

सकाळी अकराला कामकाजाला सुरवात झाली. या वेळी पॅनलवर न्यायाधीश अविनाश ढोके तसेच पंच म्हणून ॲड. प्रदीप पाटील उपस्थित होते. या वेळी ८४८ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच २५ लाख ८२ हजार ६८१ रूपयांची वसुली करण्यात आली. यात विविध राष्ट्रीयकृत बॅंक, ग्रामपंचायत कर वसुली, पतपेढीचे कर्ज वसुली आदींचा समावेश होता. तर ३७ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.

37 cases were settled by compromise in Dharangaon People Court jalgaon news
Jalgaon News: अयोध्येतील मंगल अक्षता जळगावात घरोघरी वाटणार; 101 जोडप्यांकडून विधिवत पूजन

लोकन्यायालयात तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आर. एस. पाटील, ज्येष्ठ वकील ॲड. सी. झेड. कट्यारे, ॲड. वसंतराव भोलाणे, ॲड. राहुल पारेख, ॲड. संजय शुक्ला, ॲड. दगडू माळी, ॲड. गिरीश कट्यारे, ॲड. गणेश मांडगे, ॲड. महेंद्र चौधरी, ॲड. संदीप सुतारे, ॲड. संदीप पाटील, ॲड. विक्रम परिहार, ॲड. आसिफ कादरी, ॲड. अजय बडगुजर, ॲड. प्रशांत क्षत्रिय, ॲड. एकनाथ पाटील, ॲड. ऋषभ शुक्ला आदी उपस्थित होते. यशस्वितेसाठी सर्व वकील मंडळी, सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच सहाय्यक अधीक्षक जगदीश माळी यांनी सहकार्य केले.

37 cases were settled by compromise in Dharangaon People Court jalgaon news
Jalgaon News : परवानगीशिवाय मोबाईल, लॅपटॉप वापरणे म्हणजे हॅकिंग : संदिप गादिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.