Jalgaon News : बॅरिस्टर निकमांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय

political news
political newsesakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे संस्थापक, माजी आमदार बॅरिस्टर देवराम निकम यांचे नातू व विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचे पुतणे आणि जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित दिलीप निकम आता सहकार, शिक्षण व सामाजिक क्षेत्रासोबतच राजकारणात सक्रिय होत आहेत.

येत्या मंगळवारी (ता. २७) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिीतीत ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे निकम परिवारातील तिसरी पिढी आता राजकारणात सक्रिय होत आहे.

रोहित निकम हे शिक्षण, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात काम करीत आहेत. बी. कॉम., एमबीएप्रमाणेच त्यांनी योग सायन्समध्ये एम. ए. केलेले आहे. जळगावात त्यांची ‘सॉप्टएड’ ही अग्रगण्य शिक्षण संस्था आहे.(3rd of Barrister Nikam Generation active in politics Rohit Nikam will enter BJP in presence of Fadnavis Jalgaon News)

त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण व स्टार्टअप मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे अनेकांना व्यवसायात, तसेच नोकरीतही संधी मिळाली. सहकार क्षेत्रातही त्यांचे कार्य आहे. जळगाव जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे ते संचालक, तसेच जिल्हा दूध संघाचे संचालक व ‘कृभको’ मुबंईचे ते सदस्य आहेत. इतरही सहकार संस्थांवर ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या मातोश्री शैलजा दिलीप निकम या जिल्हा बँकेच्या संचालक व कॉंग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या आहेत. वडिल दिलीप निकम हे प्रगतीशील शेतकरी असून, काका ॲड. उज्वल निकम हे राज्याचे विशेष सरकारी वकिल आहेत.

आजोबा बॅरिस्टर देवराम निकम यांनी जळगाव जिल्ह्यात सहकार क्षेत्राचा पाया रोवला. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोठे कार्य आहे. जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची त्यांनी १९५४ ते १९६७ या काळात धुरा वाहिली. १९६२ ते १९६७ मध्ये ते चोपडा तालुक्याचे आमदार म्हणून प्रचंड मतांनी निवडून आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

political news
Jalgaon News : वरखेडी गुरांच्या बाजारात विक्रमी उत्पन्न; योजनांची यशस्वी अंमलबजावणी

पश्‍चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळावर त्यांनी १९५५ ते १९५९ पर्यंत कार्य केले. प्रत्येक जिल्ह्यात सहकार प्रशिक्षण केंद्राची स्थापना त्यांनी केली. जिल्ह्यात विविध सहकारी संस्था स्थापन केल्या. केळीपासून पावडर बनविण्याचा कारखान सहकार माध्यमातून त्यांनी सुरू केला होता. मात्र मार्केटींगच्या अडचणीमुळ तो पुढे चालू शकला नाही. जिल्हा बँक चेअरमन, भूविकास बँकेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

याच परिवारातील तिसऱ्या पिढीचे रोहित निकम हे आता राजकारणात सक्रिय होत आहेत. भाजप नेते उपमुख्यंमत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ते मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षाच्या माध्यमातून कार्य करून जिल्ह्याचा विकास करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

जळगावात शैक्षणिक, विशेषत: संगणकीय क्षेत्रात त्यांचा वीस वर्षांचा अनुभव असल्याने युवकांना आगामी काळात रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यात विशेषत: जळगावात ‘आयटी हब’ निर्माण करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय शेतकरी कुंटूबातील असल्यामुळे शेती क्षेत्राच्या प्रश्‍नांची जाण असल्याचेही त्यांनी सांगितले.

political news
Jalgaon News : चाळीसगावातील वारकरी विठूरायाच्या चरणी; पंढरपूर वारीतून ३ हजार भाविकांचे दर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.