Jalgaon News : लम्पीच्या नुकसानीपोटी पशुमालकांना 4 कोटी 78 लाख; पशुधन आठवडेबाजार पूर्ववत

Lumpy skin disease
Lumpy skin disease esakal
Updated on

जळगाव : लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या आठवडेबाजारावर ऑगस्ट २०२० पासून बंदी होती. आता लम्पी चर्मरोग नसल्याचे चित्र असल्याने लसीकरणासह अन्य अटींचे पालन करण्याच्या हमीवर पशुधनाच्या आठवडेबाजारावरील निर्बंध हटविण्यात आले असल्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

आतापर्यंत ‘लम्पी’मुळे एक हजार ९०० पशुधनाचा मृत्यू झाला आहे. पशुधनाच्या एक हजार ८५९ पशुमालकांच्या संबंधित बँक खात्यावर चार कोटी ७८ लाख रुपये नुकसानीपोटी मदत शासनस्तरावरून जमा करण्यात आली आहे. (4 Crore 78 Lakhs to Cattle Owners for Loss of Lumpy Livestock weekly market undone Jalgaon News)

पशुधन आठवडेबाजार जिल्ह्यात सुरू झाले आहेत. असे असले तरी काही स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवडेबाजारात पशुधनाची खरेदी-विक्रीसाठी आवक कमी प्रमाणात आहे. त्यामुळे बाजार समितीला मिळणाऱ्या बाजार फी उत्पन्नात देखील घट आली आहे.

जिल्ह्यांतर्गत वाहतूक करावयाच्या गुरांचे लम्पी चर्मरोगाकरिता २८ दिवसांपूर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे गरजेचे आहे. वाहतूक करावयाच्या पशुधनाची ओळख पटविण्यासाठी कानात टॅग नंबर असणे, इनाफ पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे.

वाहतूक करताना विहित प्रपत्रामधील आरोग्य दाखला आणि स्वास्थ्य प्रमाणपत्र वाहनचालकाकडे, तसेच पशुपालकाकडे असणे आवश्यक आहे. पशुधनाचा आठवडेबाजार भरविण्यापूर्वी व नंतर संपूर्ण परिसरात जंतूनाशक व कीटकनाशक औषधाची फवारणी आयोजकांनी करणे बंधनकारक आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Lumpy skin disease
Nashik News : येसगावच्या ॲपल बोरांना काठमांडूत मागणी!

२४ हजार पशुधन लम्पी स्कीन संसर्गमुक्त

जिल्ह्यात आठ ते दहा लाख गोवंशीय, म्हैसवर्गीय, तसेच शेळ्या, मेंढ्यांसह अन्य पशुधन आहे. यात सुमारे चार लाख गोवंशीय पशुधनाचे लसीकरण संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यात पूर्ण करण्यात आले आहे.

लसीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणीमुळे लम्पी संसर्ग प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. आतापर्यंत संसर्गबाधित २८ हजार ४०० पशुधन उपचाराअंती पूर्णतः बरे झाले आहे. सुमारे ९०० पशुधनावर उपचार केले जात आहेत.

...या ठिकाणी होतात पशुबाजार

जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आठवडेबाजारात पशुधनाची आवक कमी-अधिक प्रमाणात दिसून आली. देशी, तसेच संकरित गोवर्गीय, म्हैस, शेळ्या आदी पशुधन विक्रीसाठी आले.

पशुधनाची सर्वांत मोठी बाजारपेठ शनिवारी चाळीसगाव, पाचोरा तालुक्यांत नगरदेवळा येथे, सोमवार तसेच गुरुवारचा वरखेडी, तर भडगाव उपबाजार समिती आवारात शुक्रवार, पारोळा येथे रविवार, तर सोमवारी अमळनेर येथे असे आठवडेबाजार असतो.

Lumpy skin disease
Rajya Balnatya Spardha : नाशिक विभागात अहमदनगरची बाजी ‘अजब लोट्यांची महान गोष्ट’ प्रथम

बाजार समितीच्या उत्पन्नात घट

लम्पी साथरोग प्रतिबंध हटविण्यात आल्यानंतर गुरुवारी प्रथमच पाचोरा बाजार समितीअंतर्गत पशुधनाचा आठवडेबाजार होता. यात नेहमीपेक्षा कमी प्रमाणात पशुधन खरेदी-विक्रीसाठी आले. पशुधनाच्या किमतीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीकडून फी आकारणी करण्यात येते.

दर आठवडेबाजारात ६० ते ६५ हजार रुपये बाजार समिती शुल्क मिळते. पहिलाच आठवडेबाजार असून, शेतीपयोगी येणारे गोवंश, तसेच दुधाळ पशुधनाची आवक बऱ्यापैकी होती.

एक हजार ८५९ पशुमालकांना मदतीचा लाभ

लम्पी स्कीन प्रादुर्भावामुळे बाधित पशुधनापैकी २८ हजार ४०० पशुधन उपचाराअंती पूर्णतः बरे झाले आहे. दरम्यान, एक हजार ९०० मृत पशुधनापोटी एक हजार ८५९ पशुमालकांच्या संबंधित बँक खात्यावर चार कोटी ७८ लाख रुपये नुकसानीपोटी मदत शासनस्तरावरून जमा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. श्यामकांत पाटील यांनी दिली.

Lumpy skin disease
Kamgar Kalyan Natya Spardha : खऱ्या मैत्रीचा अर्थ सांगणारी नाट्यकृती फ्रेंडशिप

लसीकरणासह टॅग असलेल्या पशुधनालाच परवानगी

लम्पी संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांमुळे जिल्ह्यात पशुधन खरेदी-विक्री आठवडेबाजारांवर गेल्या काही महिन्यांपासून निर्बंध होते. संसर्ग कमी झाल्याने, तसेच संपूर्ण पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

त्यामुळे गुरांचा आठवडेबाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. यात लसीकरण झालेल्या, तसेच कानात टॅग नंबर असलेल्या पशुधनालाच खरेदी-विक्रीसाठी गुरांच्या आठवडेबाजारात आणावे, असे आवाहन जिल्हाधिकारी
अमन मित्तल यांनी केले आहे.

Lumpy skin disease
Nashik Crime News : सिडकोत देहव्यापार; एकास अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.