जळगाव : कुसुंबा (ता. जळगाव) येथे सुरू असलेल्या बांधकाम साईटचे मॅनेजर सहकाऱ्यासोबत हॉटेलात जेवणाला गेले होते. तेथून परतल्यावर सुप्रीम कॉलनीतील रामदेव मंदिराजवळ दोघे मित्र बोलत उभे असताना, रिक्षातून आलेल्या चौघांनी त्यांच्याशी विनाकारण वाद घालत मारहाण करून जबरी लूट केली. (4 people who came from rickshaw argued beat forcibly robbed 2 with construction site manager jalgaon crime news)
मुळ पुणे येथील रहिवासी देवेंद्र काळे (वय ३६) रशिद कन्स्ट्रक्शनच्या बांधकाम साईटवर मॅनेजर आहेत. सोमवारी (ता. ३०) देवेंद्र काळे व सईद शकील शहा दुचाकीने (एमएच १५, सीडब्लू ८८९८) जेवणासाठी गेले होते. तेथून परतल्यावर मित्राला सोडविण्यासाठी सुप्रीम कॉलनीत गेले.
दोघे रामदेव बाबामंदिराजवळ उभे राहून बोलत असताना, रिक्षातून चार तरुण खाली उतरले. आमच्याकडे काय पाहतोय, असे म्हणत त्याच्याशी वाद घातला. काळे यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. आणखी दोन तरुण आले.
काहींनी काळे व त्यांचा मित्राला धरून ठेवले. खिशातून १८ हजारांची रोकड, मोबाईल व दुचाकीची चावी हिसकावून सर्व संशयितांनी पळ काढला. याबाबत देवेंद्र काळे यांनी दिलेल्या तक्रार दिल्यावरून सहा संशयितांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
गुन्हा घडल्यावर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक संदीप गावित यांनी भेट दिली. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या सूचनेवरून पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह पोलिस पथकाने दोन दिवस संशयितांची माहिती घेतली.
सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे, मुकेश पाटील, राहुल रगडे यांनी संशयावरून सुप्रीम कॉलनीतील चौघांना ताब्यात घेतले. पोलिस प्रसाद दिल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यावरून इतर साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे.
ओळख परेडसाठी नाव गुप्त
संशयितांना अटक करून न्याय दंडाधिकाऱ्यांसमक्ष फिर्यादीकडून संशयितांची ओळख परेड होणार असल्याने पोलिसांनी संशयितांचे नाव आणि ओळख अद्याप गुप्त ठेवली असून, चोरीचा माल शोधण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.