Jalgaon Govt Polytechnic : पदविकेसाठी जिल्ह्यात साडेचार हजार अर्ज; यंदा प्रवेशाच्या 3 फेऱ्या

4 thousand 537 applications  received for first year diploma for Government polytechnic college jalgaon news
4 thousand 537 applications received for first year diploma for Government polytechnic college jalgaon newsesakal
Updated on

Jalgaon Govt Polytechnic : शासकीय तंत्रनिकेतनासाठी प्रथम वर्ष पदविकेच्या प्रवेशप्रक्रियेत या वर्षी महाराष्ट्रात एकूण एक लाख २३ हजार ७७९ अर्ज प्राप्त झाले असून, जळगाव जिल्ह्यासाठी चार हजार ५३७ अर्ज प्राप्त झाले आहेत. (4 thousand 537 applications received for first year diploma for Government polytechnic college jalgaon news)

या वर्षी संस्थांमधील प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रियेच्या जागांपेक्षा अर्जांची संख्या जास्त असल्याने संस्थांना याबाबत दिलासा मिळाला आहे. प्रवेशप्रक्रियेसंदर्भात तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाली.

त्यानंतर उद्या (ता. १९)पर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीनमधून जी कागदपत्रे बाकी असतील, ती जमा करण्यासाठी व ज्या काही अर्ज भरताना चुका झाल्या असतील, त्या दुरुस्त करण्यासाठी सुविधा दिली जाणार आहे.

या कालावधीत विद्यार्थ्यांनी आपल्याच लॉगीनमधून दुरुस्ती E SCRUTINY असल्यास SUBMIT GRIVENCES च्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर जाऊन करून घ्यावी.

यात मुख्यत्वे ज्या विद्यार्थ्यांकडे आजही कागदपत्रे मिळालेली नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगीनमधून APPLIED BUT NOT RECEIVED या ठिकाणी क्लिक करून कागदपत्रे मिळविण्यासाठी अर्ज केल्याची पोच पावती (टोकन पावती) receipt मध्ये जोडावी व कागदपत्र आपण दुसऱ्या फेरीच्या reporting च्या अंतिम तारखेपर्यंत जमा करणार असल्याचे हमीपत्र undertaking यात जोडावे. हमीपत्राचा नमुना DTE mumbai च्या वेबसाईटलवर दिला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

4 thousand 537 applications  received for first year diploma for Government polytechnic college jalgaon news
Career Options in Finance : बँकेत काम करायचंय?

यंदा प्रवेशाच्या तीन फेऱ्या

रविवारी (ता. २३) अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल व सोमवार (ता. २४)पासून महाविद्यालय निवडीची प्रक्रिया म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरणे सुरू होईल. या वर्षी एकूण तीन फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरताना प्राधान्यक्रमाने पसंती क्रमांक भरावयाचा आहे.

विद्यार्थ्यांनी याबाबत गेल्या वर्षाचे cutoff, संस्थेचे शुल्क, तसेच संस्थेतील सोयी-सुविधा या सर्व बाबींच्या निकषांचा विचार करूनच पसंती क्रमांक ठरवायचा आहे. याबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सुविधा केंद्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन येथील शासकीय तंत्रनिकेतनचे डॉ. पराग पाटील यांनी केले आहे.

4 thousand 537 applications  received for first year diploma for Government polytechnic college jalgaon news
Career Tips : बारावीनंतर पुढे काय, करिअर ठरलं तरी सर्वोत्तम कॉलेज कसे निवडावे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.