Jalgaon News: पाणीपुरवठ्यासाठी 413 कोटींची तरतूद; अमृत 2 आराखडा मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे

Amrut 2 scheme
Amrut 2 schemeesakal
Updated on

Jalgaon News : शहरात चोवीस तास पाणी पुरवठ्यासाठी अमृत २ चा आराखडा तयार करण्यात आला असून ४१३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा आराखडा मजुंरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे. महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी ही माहिती दिली.

महापालिकेतर्फे अमृत योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा पहिला टप्पा राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्याचे नळ कनेक्शन अद्याप देण्यात येत आहेत. आता महापालिकेतर्फे अमृत योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने संपूर्ण आराखडा तयार केला आहे. (413 crore provision for water supply in Amrut 2 plan jalgaon news)

वाघूर धरण ते पंपिंग जलवाहिनी बदलणार

वाघूर धरण ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत टाकण्यात आलेली मोठी जलवाहिनी योजनेंतर्गत बदलण्याचा प्रस्तावित करण्यात आले आहे. पाणी उपसण्यासाठीचे पंप बदलण्यात येणार आहेत. अधिक अश्‍वशक्तीचे पंप बसवण्यात येणार आहेत.

ब्रिटिशकालीन गिरणा टाकी तोडणार

शहराला पाणीपुरवठा करणारी गिरणा टाकी तोडण्यात येणार आहे. या परिसरात असलेल्या दोन टाक्या तोडून त्याठिकाणी एक मोठी टाकी बांधण्यात येणार आहे. जुनी टाकी ब्रिटीशकाळात बांधण्यात आली होती.

तिच्यावरून मेहरूण तलावातील पाणी घेऊन शहराला पाणी पुरवठा करण्यात येत होता. शहराचा विस्तार झाल्यानंतर गिरणा नदीतून पाणी या टाकीत घेण्यात आले. त्यावेळेपासून तिची ‘गिरणा टाकी’ अशी ओळख झाली होती. आता याच टाकीतून शहराला पाणीपुरवठा होत आहे.

Amrut 2 scheme
Jalgaon Road Construction : जळगावमधील रस्ते होणार चकाचक; रस्त्याच्या कामासाठी 100 कोटी रूपये मंजूर

चोवीस तास पाणी मीटरने

सर्व नळांना वॉटरमीटर बसवण्याचे प्रस्तावित आहे. अमृत योजनेच्या कोणत्याही टप्प्यात वॉटर मीटर नव्हते. आता ते प्रस्तावित करण्यात आले. सरकारने त्याला मंजुरी दिल्यास मीटर बसवण्यात येतील, असे डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले.

पहिला टप्पा ८० टक्के पूर्ण

महापालिकेच्या अमृत योजनेचा पहिला टप्पा ८० टक्के पूर्ण झाला असल्याचे सांगून डॉ. गायकवाड म्हणाल्या, की अमृतच्या पहिल्या टप्प्यात ६० हजार नळजोडणी प्रस्तावित होती. मात्र त्यापेक्षा अधिक म्हणजे ८० हजार नळजोडणी झाली आहे. काही काम पूर्ण झाल्यावर हा टप्पा बंद होईल.

उर्वरित सर्व जोडणी अमृत २ योजनेत करण्यात येईल. याशिवाय रस्त्याचे काम झाल्यानंतर त्या ठिकाणी जलवाहिनीची गळती होत आहे. त्यामुळे त्याच्या जोडणीसाठी रस्ते खोदावे लागत आहेत. नागरिक अमृतची जोडणी जुन्या नळकनेक्शनला जोडत आहेत. त्यामुळे त्याच्या दाबाने अनेक भागात जलवाहिन्या फुटत आहेत.

Amrut 2 scheme
Raver Loksabha Election : ‘लोकसभेच्या' रावेर वर दावा मजबुतीसाठी काँग्रेसचे हे 3 मुद्दे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.