Jalgaon News : 6 महिन्यात 44 तरुणी प्रियकरासोबत सैराट; पाचोरा तालुक्यातील स्थिती

44 young women and married women have been reported to have leave their house with their boyfriends jalgaon news
44 young women and married women have been reported to have leave their house with their boyfriends jalgaon newsesakal
Updated on

Jalgaon News : येथील शहर व तालुक्यातून गेल्या ६ महिन्यांत ४४ तरुणी व विवाहिता घरदार व संसार सोडून प्रियकरासोबत रफुचक्कर झाल्या असून, यामुळे पालक, विवाहितांचे पती व मुले चिंताग्रस्त आहेत. हा प्रकार थांबविण्यासाठी सामाजिक सेवाभावी संस्थांनी कौटुंबिक प्रबोधनासाठी पुढे येणे गरजेचे नव्हे तर अत्यावश्यक असल्याचा सूर व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, ५ जानेवारी ते ३० जून २०२३ या ६ महिन्यांच्या काळात ४४ तरुणी व विवाहिता आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याच्या नोंदी झाल्या आहेत. (44 young women and married women have been reported to have leave their house with their boyfriends jalgaon news)

यापैकी एकही तरुणी अथवा विवाहिता आपल्या पालकांकडे अथवा पतीकडे परत आलेली नाही. यात पाचोरा पोलिस ठाणे हद्दीतील ३० व पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १४ तरुणी व विवाहिता असून, त्यापैकी ३२ तरुणी व १२ विवाहित महिलांचा समावेश आहे.

तारुण्य आपण समजू शकतो. परंतु मुले, बाळे व संसार सोडून कमी वय असलेल्या प्रियकरासोबत विवाहिता पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याने समाज मनातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. ज्या घरातील तरुणी पळून जाते, त्या कुटुंबीयांना सहन होत नाही व सांगताही येत नाही, अशा अवस्थेतून दिवस काढावे लागत आहेत.

पालक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुला-मुलींना शिकवतात, मोठे करतात. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जीवाचे रान करतात. प्रसंगी शिक्षणासाठी कर्जबाजारी होतात. आपली गरिबी मुलांच्या करिअरच्या आड येऊ नये व त्यांना कोणी हिणवू नये म्हणून महागडे कपडे, मोबाईल, गाडी यांची पूर्तता करतात.

44 young women and married women have been reported to have leave their house with their boyfriends jalgaon news
Jalna Child Marriage : तीन महिन्यांत ४२ बालविवाह रोखले जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; बालविवाह रोखणाऱ्यांचा गौरव करणार

परंतु अजाणतेपणामुळे कुणाच्या तरी प्रेमाच्या जाळ्यात अडकून तरुणी घर सोडून निघून जातात. त्यामुळे त्या कुटुंबाचा अभिमान, स्वाभिमान गळून पडतो. मरणप्राय वेदना सहन करत हे कुटुंब वाटचाल करते.

प्रियकरांसोबत पळून गेलेल्या ४४ तरुणी व विवाहितांपैकी एकही जण परत आल्याचे दिसत नाही. तरुणी आपल्या प्रियकरासोबत विवाह करून परततात. काही त्याच गावात तर काही बाहेर वास्तव्य करतात. तरुणीच्या आई वडिलांकडून पोलिसात तक्रारही दिली जाते. कार्यवाही करून मुलगी ताब्यात मिळण्याची याचना होते. परंतु कायद्यापुढे पोलिसही हतबल ठरतात. ज्या विवाहित महिला उभा संसार व मुले सोडून निघून जातात.

त्यांच्या मुलांची मानसिकता प्रचंड खालावते किंबहुना त्यांचा शैक्षणिक प्रवासही थांबतो. यात काहींचे संसार चांगले फुलतात तर काहींना आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. हा प्रकार मोबाईल, टीव्हीवरील पाश्चात्त्य संस्कृतीवर आधारित मालिका, पालकांकडून तरुणींना मिळणारी मोकळीक व आपल्या नोकरीमध्ये अडकून पडलेले पती अशी कारणे स्पष्ट होतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

44 young women and married women have been reported to have leave their house with their boyfriends jalgaon news
Jalgaon Election: एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक! २५ जुलैपासून EVMची तपासणी होणार

हा प्रकार थांबविण्यासाठी सामाजिक सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन कौटुंबिक प्रबोधन करावे. शहर व परिसरातील जे लॉज व हॉटेल चालक प्रेमीयुगलांना आश्रय त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. गिरण रोड, काकण बर्डी परिसर, पद्मालय, पाटणादेवी या परिसरात प्रेमीयुगले दिवस घालवतात. चेहऱ्याला स्कार्प बांधल्यामुळे त्यांची ओळख पटत नाही.

त्यामुळे पोलिसांनी स्कार्फ संदर्भातही नियमावली करावी, अशी अपेक्षा समाजमनातून व्यक्त होत आहे. प्रियकरासोबत पळून जाण्याचे प्रकार व प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आई वडिलांनी कुटुंबात सजग व जागृत राहणे गरजेचे आहे.

वेळोवेळी मुला-मुलींचे मोबाईल त्यांची मित्रमंडळी यांची तपासणी व चौकशी पालकांनी करावी. शाळा व महाविद्यालयात जाऊन त्यांच्या वागणुकीसंदर्भात माहिती घ्यावी. पालकांकडून आलेल्या तक्रारीनुसार हरवल्याची नोंद होते. परंतु सज्ञान तरुण-तरुणींवर कारवाई करताना कायद्याच्या अडचणी येतात. - राहुल खताळ पोलिस निरीक्षक, पाचोरा

44 young women and married women have been reported to have leave their house with their boyfriends jalgaon news
Jalgaon Politics : सत्तेतील वाटेकरू अन्‌ जिल्ह्यातील तिसरे शक्तिकेंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.